Solapur Malshiras Accident Mini Truck fell in well Irfan Muzavar saves Five Devotees; लहान बाळ बुडताना दिसलं, मागचा पुढचा विचार न करता विहिरीत उडी घेतली, इरफानने सांगितला अपघातानंतरचा थरार
Solapur Malshiras Accident Mini Truck fell in well Irfan Muzavar saves Five Devotees; लहान बाळ बुडताना दिसलं, मागचा पुढचा विचार न करता विहिरीत उडी घेतली, इरफानने सांगितला अपघातानंतरचा थरार
Malshiras Mini Truck fell in Well : तांदूळवाडी येथील इरफान मुजावर हा तरुण दुचाकीवरुन गाडीमागूनच येत होता. पिकअप पाण्यात पडल्याचं पाहून तो थांबला, इतक्यात एक लहान बाळ पाण्यात बुडत असल्याचं त्याला दिसलं आणि त्याने क्षणाचाही विचार न करता तात्काळ पाण्यात उडी घेतली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोलापूर : सिद्धनाथ महाराजांच्या दर्शनानंतर म्हसवड येथून परतणारे भाविकांचे पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक विहिरीत पडून झालेल्या भीषण अपघातात आठ जणांना प्राण गमवावे लागले, तर सात जणांचे जीव वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. एक लहान मूल पाण्यात बुडताना पाहून बाजूने जाणारा दुचाकीस्वार इरफान मुजावर याने तात्काळ पाण्यात उडी घेतली. बालकाला छातीशी कवटाळून धरत त्याच्या पोटात गेलेलं पाणी बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचवला.
पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथील १५ भाविक पिकअप वाहनाने सिद्धनाथ महाराजांच्या दर्शनासाठी म्हसवड येथे गेले होते. दर्शन आटोपून परत येत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्याशेजारील शेतातील मोठा व्यास असलेल्या आणि पाण्याने भरलेल्या खोल विहिरीत पिकअप वाहन कोसळले.
पाण्यात हालचाल जाणवल्यावर इरफानने ग्रामस्थांच्या मदतीने दोन लहान मुले, एक महिला आणि दोन पुरुषांनाही बाहेर काढले, तर दोघे पुरुष पोहून बाहेर आले. परंतु पिकअप वाहन विहिरीत उलट्या बाजूने पडल्याने आतमध्ये असणाऱ्या सात महिला आणि एक सहा महिन्याच्या बाळाला प्राण गमवावे लागले, याबाबत इरफानने खंत व्यक्त केली.
Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट? EL Nino Effect in India
मृतांमध्ये इंदुबाई दशरथ बावचे (६०), पूजा अमोल सातोरे (२३), पूजा बालाजी बावचे (२७), अश्विनी संदीप बावचे (२७), संस्कार संदीप बावचे (१४), संस्कृती संदीप बावचे (१४), आरव अमोल सातोरे (८) आणि समर्थ बालाजी बावचे (६ महिने) यांचा समावेश आहे. Delhi Fire : दिल्लीतील इमारतीत आग लागली नाही, लावली! CCTV मध्ये भयंकर उलगडा, स्कूटर जाळण्याच्या नादात तीन जीव गेले विहिरीतून जिवंत बाहेर काढलेल्या सर्वांना तातडीने पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघाताची कसून चौकशी केली जाणार असून ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची माहिती घेऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिला.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा