Headlines

Ambernath Vishakha Tilkar Death Case Doctor Husband spies through CCTV Camera Crime News; दीड महिन्यांपूर्वी विवाह, डॉक्टर नवऱ्याची CCTV तून पाळत, शेजारणीशी बोलल्याचा जाब विचारला, नवविवाहितेची गूढ अखेर


Ambernath Married Woman Death : विशाखाचा विवाह ३० एप्रिल रोजी डॉ. नितीन तिळकर याच्याशी झाला होता. सासरी गेल्यावर लगेचच तिला मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागले, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Ambernath Vishakha Tilkar Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठाणे : अंबरनाथ येथील एका २६ वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच आयुष्याची अखेर केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी तिचा डॉक्टर पती आणि सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ, शारीरिक अत्याचार आणि सतत सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाळत ठेवल्याचा आरोप केला आहे.

विशाखा तिळकर असे मृत महिलेचे नाव असून, मंगळवारी ती आपल्या सासरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी तिचा पती डॉ. नितीन तिळकर , सासू छाया तिळकर आणि दीर निनाद तिलकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या तिघांनाही बुधवारी अटक करण्यात आली.

दीड महिन्यांपूर्वी विवाह

तक्रारीनुसार, विशाखाचा विवाह ३० एप्रिल रोजी डॉ. नितीन तिळकर याच्याशी झाला होता. लग्नापूर्वी त्यांचे संबंध सलोख्याचे असले तरी, सासरी गेल्यावर लगेचच तिला मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागले, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. लग्नात मिळालेल्या भेटवस्तूंबाबत असमाधान व्यक्त करत आरोपींनी तिच्या पालकांकडे अतिरिक्त सोन्याचे दागिने आणि रोख रकमेची मागणी केली होती, असे म्हटले जाते.
Maharashtra TimesPune Crime : खडकवासल्यात हिरे व्यापाऱ्याचा गूढ अंत, दोन चपलांमुळे पोलिसांना संशय, अखेर पत्नीला कॉल आला अन् मोठा भांडाफोड

पत्नीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही

डॉ. तिळकर याने आपल्या विशाखाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी घराच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते, असा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. विशाखाच्या दैनंदिन हालचालींबद्दल तिला जाब विचारला जायचा आणि शेजाऱ्यांशी बोलताना दिसल्यास तिला मारहाण केली जायची. मृत्यूच्या दोन दिवस आधी, शेजारच्या एका महिलेशी बोलल्याच्या कारणावरुन तिच्या पतीने तिला मारहाण केली होती, असेही सांगण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी फायद्याची योजना कोणती? एकाच वेळी ४ योजनांचा लाभ घ्या

माहेरी परत आणण्याआधीच आक्रितः

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाखाने आपल्या आईला होणाऱ्या छळाबद्दल सांगितले होते आणि आपल्या परिस्थितीबाबत व्यथा मांडली होती. तिचे आई-वडील तिला परत घरी आणण्याच्या तयारीत होते, परंतु त्याआधीच मंगळवारी त्यांना तिच्या मृत्यूची बातमी मिळाली.
Maharashtra TimesKishori Pednekar : संजय दिना पाटलांच्या लेकीचा एक पाय इकडे, एक तिकडे; ‘उबाठा’चे 64 नगरसेवक आले, एकट्या राजूल गायब, किशोरी पेडणेकर संतापल्या
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील म्हणाले, “आमच्या प्राथमिक तपासातून असे दिसून आले आहे की, घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते आणि आरोपी पती आपल्या पत्नीच्या हालचालींवर लक्ष ठेवत असे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे, आम्ही पती, सासू आणि दीर यांच्याविरुद्ध क्रूरता आणि जीव देण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.”

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा