Fayyaz Premji : पत्नी सोडून गेली, भाऊ-वहिनीसह कुटुंबीय प्रेमाने वागवत नसल्याने फय्याज मानसिक दडपणात होता. वेगवेगळ्या प्रकारची औषधे-गोळ्यांचे तो सेवन करायचा. ही सर्व परिस्थिती आपल्या समाजामुळेच झाल्याची भावना फय्याजच्या मनात रुजली होती.

मोहरमच्या गर्दीमुळे विषप्रयोगाचा कट
पोलिस कोठडीत असलेल्या फय्याज याच्या चौकशीत त्याच्या वैवाहिक व कौटुंबिक अस्थिरतेविषयी माहिती मिळाली आहे. चार वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला. मात्र, पत्नी सोडून गेली. भाऊ, वहिनी, कुटुंबीय प्रेमाने वागवत नसल्याने तो मानसिक दडपणात होता. वेगवेगळ्या प्रकारची औषधे आणि गोळ्या याचे तो सेवन करायचा. ही सर्व परिस्थिती आपल्या समाजामुळेच झाल्याची भावना फय्याजच्या मनात होती. पत्नी सोडून जाण्यास, कौटुंबिक अस्थिरतेला समाजच कारणीभूत असल्याचे त्याला वाटायचे. याचाच सूड उगवण्यासाठी तो संधीची वाट पाहत होता. मोहरमला गर्दी उसळत असल्याने याच वेळी विषप्रयोग करण्याचे त्याने ठरवल्याचे तपासातून समोर आले.
…तर अनेकांच्या जीवाशी खेळ झाला असता
फय्याज याने दिलेली कॅप्सूल खाल्ल्याने सलमान यांची प्रकृती ढासळली. घरी पोहोचलेल्या सलमान यांनी तब्येत खालावल्याने डोंगरीतील रुग्णालयात जायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी डोंगरीतील इमामवाडा परिसरातील शिया समाजातील नेत्यांना याबाबत कळवले. त्यानंतर या नेत्यांनी जुलूसमध्ये अनेकांना कळवले. त्यामुळे अनेकांनी फय्याजने दिलेली कॅप्सूल खाल्ली नाही. सलमान यांनी कळवलेच नसते, तर अनेकांना त्रास झाला असता.
Pune Crime : ना 17 करोडचा महाल, ना दोन चार्टर्ड विमानं बूक; माझी ऐपत 4 कोटींची, वऱ्हाडींवर पर कपल 81 हजार खर्च, सियाच्या बाबांचा हिशोब
दहशतवादाशी संबंध नाही
आपल्याच समाजाबद्दल द्वेष असला, तरी फय्याज धर्मांध, कट्टरपंथीय नाही. तो कोणत्याही दहशतवादी संघटनांच्या संपर्कात नसल्याचे तपासात आढळले आहे. त्याने इराक आणि इराण वारी केल्याने अजूनही कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहानिशा करण्यासाठी सर्व बाजूने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचा मोबाइल तपासणीसाठी न्यायवैद्यक शाळेकडे पाठवण्यात आला असून, गेल्या काही दिवसांत इंटरनेटद्वारे केलेल्या हालचाली, संपर्क याची माहिती जाणून घेतली जात आहे.
उद्धव ठाकरे सेनामुक्त महाराष्ट्र, जे उरलंय ते सांभाळा; गिरीश महाजनांचा पलटवार
पुण्यात कुटुंबाची चौकशी
पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. की आरोपी फय्याज प्रेमजी याच्या पुण्याच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात उंदीर होते. या उंदरांचा नायनाट करण्यासाठी तो नियमितपणे ‘झिंक फॉस्फाइड’ या विषारी रसायनाचा वापर करीत असे. मुंबईतील मोहरम मिरवणुकीत कथित विषारी कॅप्सुल वाटप प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रविवारी पुण्यातील विमानतळ परिसरातील फय्याज प्रेमजी याच्या घरी जाऊन चौकशी केली. या वेळी त्याचे आई-वडील आणि भावाची सुमारे पाच ते सहा तास कसून चौकशी करण्यात आली.
दोन वर्षांपासून मुंबईत वास्तव्य
तपास यंत्रणांनी आरोपीच्या कुटुंबीयांकडून त्याच्या हालचाली, संपर्क, राहण्याची पद्धत; तसेच अलिकडील व्यवहारांबाबत माहिती घेतली. घराची पाहणी करून काही आवश्यक माहितीही संकलित करण्यात आली. प्राथमिक तपासानुसार, फैयाज प्रेमजी हा मूळचा पुण्यातील विमानतळ परिसरातील रहिवासी आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून तो कुटुंबापासून वेगळा राहत असून, मुंबईत वास्तव्यास होता. या काळात त्याचे नेमके कोणाशी संबंध होते; तसेच त्याच्या हालचालींचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत.
Mayank Lohar : मयंकचा जीव धोक्यात, बाकीच्या प्रवाशांनी रोशनला धरलं का नाही? सर्वांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्षदर्शीने दिलं; डब्यात एकच गोंधळ उडाला
मुंबई पोलिसांनी शुक्रवारी भायखळा परिसरातील मोहरम मिरवणुकीदरम्यान फैयाज प्रेमजी याला ताब्यात घेतले होते. तो हर्बल पेनकिलर असल्याचे सांगून भाविकांना कॅप्सुल वाटत होता. मात्र, त्या कॅप्सुलमध्ये उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे झिंक फॉस्फेट असल्याचे तपासात समोर आले. त्याच्याकडून १४ हजार ९०० कॅप्सूल जप्त करण्यात आल्या असून, ५० किलो झिंक फॉस्फेट पावडर आणि ३० हजार रिकाम्या कॅप्सूलची ऑनलाइन मागणी केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आरोपीचा नेमका उद्देश काय होता, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास मुंबई पोलिस आणि एटीएसकडून सुरू आहे.

