Headlines

Washim Husband Wife Died After Falling In Well In Farm; विहिरीजवळ चपला दिसल्या, संशय आला पण उपयोग नाही झाला, पती -पत्नीनं…; वाशिम हळहळलं


Washim husband and wife death: वाशिम जिल्ह्यातील सवासनी गावात किरकोळ वादातून पती-पत्नीचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नीने विहिरीत उडी मारल्यानंतर तिला वाचवण्यासाठी पतीनेही उडी मारली, मात्र…

washim husband and wife drown in well both died
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पंकज गाडेकर, वाशिम: वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील सवासनी या गावात एका दुर्दैवी घटनेत पती-पत्नीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पत्नीने विहिरीत उडी मारली आणि तिला वाचवण्यासाठी पतीनेही उडी मारली. मात्र, दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघांचाही जीव गेला आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली आहे.

अमोल किसन जगताप (४०) आणि सीमा अमोल जगताप (३५) या दाम्पत्यामध्ये मंगळवारी संध्याकाळी एका क्षुल्लक कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की रागाच्या भरात पत्नी सीमाने शेजारच्या शेतातील विहिरीत उडी मारली. हे पाहून अमोलनेही क्षणाचाही विचार न करता पत्नीला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. दुर्दैवाने, दोघांनाही पोहता येत नव्हते. त्यामुळे दोघांनाही स्वतःला वाचवता आले नाही आणि ते विहिरीत बुडून मरण पावले.

Maharashtra Timesचोवीस तासात अजितदादांचा राजीनामा झाला नाही तर दिल्ली गाठणार, अंजली दमानियांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा

रात्री उशिरापर्यंत अमोल आणि सीमा घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. रात्री सुमारे ११ वाजता विहिरीजवळ दोघांच्या चपला दिसल्या. यावरून काहीतरी अनुचित घडल्याचा संशय आला आणि तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.

मंगरूळपीर पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाशी संपर्क साधला. रात्रीच्या वेळी शोधकार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे पहाटेच बचाव पथकाने शोधमोहीम सुरू केली.

जवळपास एका तासाच्या अथक प्रयत्नांनंतर बचाव पथकाला प्रथम पत्नी सीमाचा मृतदेह विहिरीत सापडला. त्यानंतर पती अमोलचा मृतदेहही त्याच विहिरीत असण्याची शक्यता वाटल्याने शोधकार्य सुरूच ठेवले. अखेर पती अमोलचा मृतदेहही विहिरीतच आढळून आला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले.

या हृदयद्रावक घटनेमुळे सवासनी गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे. एका किरकोळ वादातून घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास मंगरूळपीर पोलिस करत आहेत.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा