Headlines

Bhandara Crime: विद्यार्थिनींशी आक्षेपार्ह वर्तन; संतप्त गावकऱ्यांचा शिक्षकाला चोप, ZP शाळेतील प्रकार


Bhandara Crime: शिक्षकी पेशाला कलंक लावणारी घटना भंडाऱ्यातील जिल्हा परिषद शाळेत घडली आहे. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी त्या शिक्षकाला चांगलाच चोप दिला.

bhandara crime
शिक्षकाचे विद्यार्थिनींशी आक्षेपार्ह वर्तन(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा, भंडारा: पवनी तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनींना मोबाइलवर घाणेरडे व्हिडीओ दाखवून आक्षेपार्ह चाळे केले. खिचडी बनविणाऱ्या महिलेने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर संतापाची लाट उसळली. त्यानंतर गावकऱ्यांनी शिक्षकाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

प्रकरण काय?
अनिल जगन राऊत (५४) असे शिक्षकाचे नाव असून, तो लाखांदूर येथील साईनाथ वसाहतीत वास्तव्यास आहे. पवनी तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकी शाळेत तो कार्यरत आहे. शाळेत रुजू झाल्यापासूनच तो इयत्ता तिसरी आणि चौथ्या वर्गातील मुलींशी आक्षेपार्ह चाळे करीत असे. मुलींना घरी सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत होता. भीतीपोटी आजपर्यंत मुलींनी सदर बाब पालकांना सांगितली नव्हती. मात्र, सोमवारी, ९ मार्चला चिमुकल्यांना शिक्षकाचा हा त्रास सहन न झाल्याने शाळेतील खिचडी शिजविणाऱ्या महिलेकडे घडलेला प्रकार सांगितला. खिचडी शिकविणाऱ्या महिलेने घडलेला घृणास्पद प्रकार चिमुकल्यांच्या आई-वडिलांना सांगितला.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar Fire : धुळे-सोलापूर महामार्गावर हॉटेलवर जेवणासाठी थांबलेली प्रवाशांनी भरलेली बस आगीच्या भक्ष्यस्थानी
गावकऱ्यांकडून शिक्षकाला चोप
सदर प्रकार ऐकून सुन्न झालेल्या आई-वडिलांनी गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना घेऊन लगेच पोलिसपाटील यांच्या निदर्शनास सदर प्रकरण आणून दिले. गावकरी व पोलिस पाटलांनी मंगळवारी शाळेत जाऊन चौकशी केली असता शिक्षकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी शिक्षकाला चोप दिला . पोलिस पाटील यांनी लागलीच पोलिसांना फोन करून घडलेला प्रकार सांगताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या घटनेमुळे सर्वस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Maharashtra TimesCrime News: हॉटेलवरील घटना लपवण्याचा प्रयत्न फसला; 6 महिन्यांनी आचाऱ्याची बॉडी खड्ड्यातून बाहेर, बिंग फुटलं
यापूर्वी तीन वर्षांचा कारावास
सदर शिक्षकाने यापूर्वी लाखांदूर येथे कार्यरत असताना शाळेत एका १२ वर्षीय मुलीशी असेच चाळे केल्यामुळे २०१८मध्ये त्याने तीन वर्षे कारागृहात घालविल्याची माहिती पोलिस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांनी दिली. आरोपीला अटक करून बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा