विधानपरिषद निवडणुकीच्या विजयाची औपचारिकता बाकी; जळगावात रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया – ravindra chavan confident of mahayuti victory in jalgaon mlc
विधानपरिषद निवडणुकीच्या विजयाची औपचारिकता बाकी; जळगावात रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया – ravindra chavan confident of mahayuti victory in jalgaon mlc
जळगाव विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरी शमवण्यात अखेर महायुतीला यश आलंच, पण तरी ऐनवेळी क्रॉस वोटिंगसारखे प्रकार होऊ नये याची दक्षता देखील घेतली जातेय. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जळगावात महायुतीची बैठक पार पडली. यावेळी रवींद्र चव्हाणांनी महायुतीच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी राहिलीय, असं म्हणत सर्वच ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.