Headlines

Pandharpur Tembhurni Railway Gate 24 Year Old Youth Dies After being Hit by Train; धावत्या रेल्वेची जोरदार धडक, 24 वर्षीय रोहितचा करुण अंत, अपघातानंतर मावशीच्या घराच्या दरवाज्यावर धक्कादायक दृश्य; पंढरपुरात खळबळ


Pandharpur Accident News : सोलापुरातील पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Tembhurni Railway Gate Youth Accident
टेंभुर्णी रेल्वे गेट तरुण अपघात(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अरुण बाबर, सोलापूर (पंढरपूर) : धावत्या रेल्वेची धडक लागल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास घडली. मात्र, अपघातानंतर संबंधीत मृत तरुणाचा तुटलेला पाय एका घराच्या दरवाज्यावर टांगल्यानं पंढरपूर शहरात खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव रोहित मधुकर कोरे (वय 24, रा. अनिल नगर, पंढरपूर) असं आहे.

नेमकी घटना काय?

पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या माहितीनुसार, काल मंगळवारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास पंढरपुरातील टेंभुर्णी रेल्वे गेटजवळ एका अनोळखी तरुणाचा आणि रेल्वेचा अपघात झाला. रेल्वेची धडक बसल्यानं त्याचा मृत्यू झाला. पंढरपूर रेल्वे स्टेशनचे उपप्रबंधक गंगाराम कुमार यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात कळवलं. मात्र, एका घराच्या दरवाज्याजवळ त्याच्या पायाचा तुकडा बांधण्यात आलेला आढळून आला.
Maharashtra TimesBhaskar Jadhav: उद्धव ठाकरेंना पक्षफुटीचा दुसरा मोठा धक्का, भास्कर जाधवांकडून मोलाचा सल्ला; नवसंजीवनीचा फॉर्म्युलाही सांगितला!

मावशीच्या घराच्या दरवाज्यावळ तुटलेला पाय

हा तुटलेला पाय बेवारस व्यक्तीचा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. त्यातून मृत तरुणाचं नाव रिक्षाचालक रोहित मधुकर कोरे याचं नाव समोर आलं. रोहितचा तुटलेला पाय त्याच्याच मावशीच्या घरासमोरील दरवाज्याजवळ टांगलेल्या स्थितीत होता. यामुळे रोहितचा अपघात झाला नसून, त्याची हत्या झाली असल्याचा आरोप त्याच्या संतप्त नातेवाईकांनी केला आहे. ‘माझा मुलगा कधीही रेल्वे रुळांवर जात नव्हता. रात्री काहीजणांसोबत त्याचा वाद झाला होता. त्याच वादातून माझ्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेमागचं रहस्य शोधून काढण्यासाठी वरीष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी रोहितच्या मोबाईलचे रेकॉर्ड आणि शहरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण पाहण्याचं काम करत आहेत.
Maharashtra TimesShivsena UBT : ठाकरेंच्या फुटलेल्या खासदाराचा मुलगा विधानपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवार, सुपुत्राची धाकधूक वाढली; नांदेडमध्ये आता काय होणार?

पिकअप गाडी विहिरीत कोसळली

दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच माळशिरसमध्ये मोठी घटना घडली. एक भरधाव पिकअप विहिरीत जाऊन कोसळल्याने मोठा भीषण अपघात झाला. या अपघातात 15 जणांपैकी आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण जिल्ह्यात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा