Headlines

Gondia Leopard Attack: चार वर्षीय चिमुकल्याचा करुण अंत; आई-वडिलांच्या डोळ्यादेखत बिबट्याने नेलं उचलून, गोंदियातील घटना – gondia tiroda taluka 4 yrs old boy died in leopard attack


Gondia Leopard Attack : गोंदियात चार वर्षीय बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

gondia leopard
gondia leopard(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा, गोंदिया: तिरोडा तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) येथे शुक्रवारी सकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक चार वर्षीय बालक ठार झाला. हियांश शिवशंकर रहांगडाले (वय ४) असे मृत बालकाचे नाव आहे.

हियांश हा शुक्रवारी सकाळी आपल्या आई-वडिलांसोबत घराच्या मागील अंगणात चुलीजवळ बसलेला होता. याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करत चिमुकल्याला उचलून नेले. पालकांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग केला ; मात्र तो बालकाला घेऊन जंगलात पसार झाला. गावकऱ्यांनी शोध घेतला असता घरापासून काही अंतरावर हियांशचा मृतदेह सापडला .

Maharashtra TimesNashik News: जीवघेण्या थंडीचा पहिला बळी; निफाडमध्ये कडाक्याच्या थंडीने 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, परिसरात हळहळ
यापूर्वी, तिरोडा तालुक्यातील इंदोरा निमगाव येथील रूची देवानंद पारधी (वय ९) ही आई-वडिलांसोबत शेतात गेली असाताना बिबट्याने तिच्यावर हल्ला केला होता. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या रूचीला गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

मागील काही दिवसांपासून तिरोडा तालुक्यातील काही भागांत बिबट्या आणि वाघाचा संचार वाढल्याची माहिती वनविभागाला दिली होती. मात्र, त्यावर कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळेच शुक्रवारची घटना घडली आणि चिमुकल्या हियांशचा बळी गेला, असा आरोप गावकऱ्यांनी केला. या वन्यप्राण्यांचा ताबडतोब बंदोबस्त केला जावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Maharashtra TimesNashik Crime: नाशिकमध्ये 24 लाखांचे ड्रग्ज जप्त; लष्करात पुरवठा केल्याचा संशय, तिघे अटकेत
महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना समोर आल्या असून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे . या पार्श्वभूमीवरच, तिरोडा तालुक्यातील ही घटना समोर आली आहे. बिबट्यांच्या समस्येवर उपाय काढण्याची मागणी होत आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा