Headlines

Chandrapur Farmer: किडनी विकलेल्या शेतकऱ्यानं मागितलं इच्छामरण; सावकारपीडित शेतकरी रोशन कुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


Chandrapur Farmer Seeks Euthanasia: जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवित त्यांनी सरकारला ‘माझी पूर्ण शेती मला परत करून आर्थिक मदत करावी, सावकारांची संपत्ती लवकरात लवकर गोठवावी, अशी मागणीही केली आहे.

farmer sold kidney
शेतकऱ्यानं मागितलं इच्छामरण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: अवैध सावकारांच्या कर्जाच्या विळख्यात अडकून स्वतःची किडनी विकण्याची वेळ आलेल्या रोशन कुळे या शेतकऱ्याने आता इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या मिंथूर येथील रोशन कुळे या शेतकऱ्याने सावकाराच्या जाचामुळे आपली किडनी कम्बोडिया येथे विकल्याचे प्रकरण डिसेंबर महिन्यात उघडकीस आले होते. नेत्यांनी त्यांच्या भेटी घेऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवैध सावकारांची संपत्ती गोठवण्याचे आदेश दिले होते. मात्र दीड महिना उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असा आरोप कुळे यांनी केला आहे. आपली व्यथा मांडणारे पत्रही कुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. यात त्यांनी ‘माझ्या प्रकरणात शासनाने कारवाई केली. आपल्या हस्तक्षेपामुळे मला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली. सध्या माझे जीवन पूर्णपणे हलाखीचे झाले आहे.

Maharashtra TimesSolapur Car Accident: सोलापुरात भीषण अपघात! पुलावरुन कार थेट कालव्यात कोसळली; मुलीसह आई-वडिलांचा बुडून मृत्यू, जावई थोडक्यात बचावला
एवढेच नव्हे तर, जीवन जगण्यासाठीसुद्धा काहीही साधन उरलेले नाही. माझ्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत दयनीय व हलाखीची झाली आहे. सावकारांनी माझ्यावर दबाव टाकून बळजबरीने संपूर्ण शेती बळकावली आहे. माझ्या वडिलांच्या नावे असलेली ०.४५ हेक्टर शेती स्वतःच्या नावे करून घेतली, तसेच ०.९९ हेक्टर शेती दलालामार्फत त्यांच्या पत्नीच्या नावे करून घेतली. ही सर्व प्रक्रिया आमच्या इच्छेविरुद्ध व बळजबरीने करण्यात आली आहे’, असेही कुळे यांनी नमूद केले आहे.

Maharashtra TimesAnjali Damania: रुपाली चाकणकरांचे खरातला 177 कॉल्स; अंजली दमानियांचा दावा, बड्या मंत्र्यांची घेतली नावं!
मला बळजबरीने किडनी विकण्यास भाग पाडले. मी एका किडनीवर जगत आहे. माझ्या प्रकरणात कारवाई झाली असली तरी आरोपींची संपत्ती गोठवली नाही. शेती परत मिळालेली नाही. चार महिन्यांपासून न्यायासाठी फिरतोय, पण कुठेही दखल घेतली जात नाही. – रोशन कुळे, सावकारपीडित शेतकरी

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा