रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढचे काही दिवस असेच उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी दुपारच्या शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्णता आणि दमट हवामानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. लहान विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजीसाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या वेळेत तात्काळ बदल करण्यात आला आहे. दुपारच्या सत्रात भरणाऱ्या सर्व शाळा १९ जून २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत सकाळच्या सत्रात भरविण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन ना. जावळे यांनी दिले आहेत.
भारतीय हवामान विभागाने (IMD) रायगड जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर किंवा संध्याकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह गडगडाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, अपेक्षित मान्सून अद्याप सक्रिय न झाल्याने वातावरणातील उष्णता आणि आर्द्रतेचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, एल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सूनच्या आगमनात आणि प्रगतीत विलंब होत आहे. त्यामुळे रायगडसह कोकणातील अनेक भागांत उष्णतेची तीव्रता वाढली आहे. नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींवर या हवामानाचा विपरीत परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांच्या वेळा बदलण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या प्रस्तावाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आदेश जारी केले आहेत.
या निर्णयामुळे दुपारच्या कडाक्याच्या उष्णतेत विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागणार नाही, तसेच उष्माघात, निर्जलीकरण आणि अन्य उष्णताजन्य आजारांचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्हा प्रशासनाने पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनांना या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांनीही उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे आणि अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पाऊस कधी दाखल होणार?
राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अपेक्षित पावसाला सुरुवात झालेली नाही. राज्यभरात कडाक्याचं ऊन पडत आहे. अनेक जिल्ह्यांना तर उष्णतेच्या लाटेचा अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात येत आहे. मुंबई, ठाणे, रायगड अशा विविध जिल्ह्यांमध्ये उकाड्याने नागरीक हैराण झाले आहेत. नागरिकांना प्रचंड त्रास होतोय. आता जून महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला तरी अपेक्षित पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना पाऊस नेमका कधी येणार? असा प्रश्न भेडसावत आहे. हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा