Latur Deoni Poor Farmer Wife Pull Plough due to Bull Dies Struck by Lightning; गरिबीची विदारक झळ! वीज पडून बैल दगावला, नवीन खरेदी करायला पैसे नाही, बळीराजानं धनीणलाच जुंपलं औताला; मन हेलावणारा Video
Latur Deoni Poor Farmer Wife Pull Plough due to Bull Dies Struck by Lightning; गरिबीची विदारक झळ! वीज पडून बैल दगावला, नवीन खरेदी करायला पैसे नाही, बळीराजानं धनीणलाच जुंपलं औताला; मन हेलावणारा Video
Latur Marathi News : वीज पडून एक बैल दगावल्याने कुटुंब अडचणीत, नवीन बैल खरेदी करायला पैसे नाहीत; लातूरच्या देवणी तालुक्यात शेतकऱ्याने आपल्या धनीणलाच औताला जुंपलं, याता व्हिडिओ व्हायरल होत आहे.
लातूर देवणी महिलेनं नांगर ओढला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, लातूर : देवणी तालुक्यातील बोंबळी येथील एका शेतकरी कुटुंबाची विदारक परिस्थिती समोर आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बैल दगावल्याने शेतीची कामे ठप्प होऊ नयेत म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीने दुसऱ्या बैलाच्या जागी स्वतःला औताला जुंपून घेतले. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना देवणी येथील बोंबळी गावात घडली. स्वतःला औताला जुंपून औत ओढणाऱ्या या वृद्ध महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हौसाबाई काशीनाथ गायकवाड असे या महिलेचे नाव असून, देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ पुंडलिक गायकवाड यांच्या त्या पत्नी आहेत.
दुसऱ्या बैलाच्या जागी औत ओढण्याचं काम
शेतात काही दिवसांपूर्वी त्यांचा एक बैल वीज पडून मृत्युमुखी पडला. खरीप हंगामातील पेरणीची वेळ सुरू असताना दुसरा बैल खरेदी करण्याइतकी आर्थिक परिस्थिती नसल्याने अखेर कुटुंबाने स्वतःच शेतीची मशागत करण्याचा निर्णय घेतला. या वेळी काशीनाथ गायकवाड नांगर हाकत असताना त्यांच्या पत्नी हौसाबाई काशीनाथ गायकवाड यांनी दुसऱ्या बैलाच्या जागी औत ओढण्याचे काम केले. वृद्धापकाळातही शेती वाचवण्यासाठी या दाम्पत्याचा संघर्ष सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील कठोर वास्तव अधोरेखित करणारे हे दृश्य सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या गायकवाड कुटुंबाला मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
काशिनाथ गायकवाड हे स्वतः भूमिहीन आहेत. त्यांच्याकडे स्वतःची मालकीची जमीन नाही. गावातील इतर शेतकऱ्यांची जमीन कसून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांना दोन मुले आणि चार मुली, असा परिवार आहे. बोंबळी हे गाव वलांडी परिसरालगत असून येथील बहुतांश नागरिक शेती आणि मजुरीवरच अवलंबून आहेत. अचानक उद्भवलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे गायकवाड कुटुंबासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरीवर्गातून केली जात आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा