Headlines

Five Youths From Chhatrapati Sambhajinagar Drowned at Ganpatipule Beach


छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन येथील तरुण विकेंडच्या निमित्ताने गणपतीपुळ्यात आले होते. एकूण 19 तरुणांचा ग्रुप गणपतीपुळ्यात आला होता. सकाळी दर्शनानंतर हे तरुण समुद्र किनाऱ्यावर गेले. यावेळी 8 तरुण हे समुद्राच्या खोल पाण्यात ओढले गेले. यापैकी 3 तरुणांना वाचवण्यात यश आलं. तर 5 जणांचा करुण अंत झाला आहे.

chhatrapati sambhajinagar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : विकेंडची सुट्टी आनंदात घालवण्याचे स्वप्न घेऊन कोकणात गेलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटकांबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी दुर्घटना घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी २० जूनला तरुण समुद्रात बुडाले. हे पाचही जण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथील रहिवासी आहेत. त्यांचे वय अवघे १९ ते २२ वर्षे आहे. सध्या स्थानिक प्रशासन आणि जीवरक्षकांकडून समुद्रात युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे.

आदित्य संतोष राऊत (वय २२ वर्ष), अनिकेत बंडू हिवराळे (वय २० वर्षे), आनंद राजू नरवडे (वय २० वर्षे), प्रेम दीपक आदमाने (वय १९ वर्षे), यश रामेश्वर कांबळे (वय १९ वर्षे) अशी मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत.

दरम्यान, या संपूर्ण घटने प्रकरणी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, बिडकीन येथून शनिवार-रविवारच्या सुट्टीनिमित्त एकूण 19 जणांचा ग्रुप गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. सकाळी सर्वांनी मिळून प्रसिद्ध श्री देव गणपतीचे मनोभावे दर्शन घेतले. देवदर्शन आटोपल्यानंतर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास यातील काही जण समुद्राचा आनंद घेण्यासाठी आणि पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, हाच आनंद काही क्षणांत विरघळला.

पावसाळ्याचे दिवस असल्याने समुद्रात अचानक लाटांचा वेग आणि पाण्याचा प्रवाह वाढला. पाण्यात उतरलेल्या तरुणांना याचा अंदाज आला नाही, त्यामुळे 8 जण वेगाने खोल पाण्याकडे ओढले गेले. आपल्यासोबतचे मित्र डोळ्यांदेखत बुडत असल्याचे पाहून किनाऱ्यावरील इतर सहकाऱ्यांनी एकच आक्रोश केला. हा आक्रोश ऐकून किनाऱ्यावरील स्थानिक जीवरक्षक, ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता समुद्रात उड्या घेतल्या. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून 3 तरुणांना समुद्राच्या पाण्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढले, मात्र 5 तरुण पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने बेपत्ता झाले.

बिडकीन परिसरावर मोठी शोककळा, शोध मोहीम तीव्र

या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी तातडीने गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाले. सध्या समुद्राला उधाण आल्यासारखी परिस्थिती असून पाण्याचा प्रवाह मागे खेचणारा आहे. त्यामुळे बचाव कार्यात मोठे अडथळे येत आहेत. तरीही स्थानिक शोध पथक, पोलीस आणि जीवरक्षकांकडून जोरदार शोध मोहीम सुरू आहे. या घटनेमुळे बिडकीन परिसरात आणि संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर मोठी शोककळा पसरली आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा