Headlines

भास्कर ग्राउंड रिपोर्ट:बांगलादेशात हिंदूंविरुद्ध 5 महिन्यांत 645 गुन्हे, 95 मंदिरांमध्ये तोडफोड, नव्या सरकारमध्येही स्थिती तशीच, अल्पसंख्याक दहशतीत


  • Marathi News
  • International
  • 645 Crimes Against Hindus In Bangladesh In 5 Months, 95 Temples Vandalized, Situation Remains The Same Under The New Government, Minorities Are In Terror

अमानुर रहमान4 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

बांगलादेशात राजकीय सत्तांतर, नव्या सरकारकडून सुरक्षेची हमी दिल्यानंतरही हिंदूंविरोधातील घटनांमध्ये घट झाल्याची चिन्हे दिसली नाहीत. मानवी हक्क संघटना एएसके, बांगलादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन ओइक्या परिषद व एचआरसीबीएम यांच्या आकडेवारीनुसार, १२ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर अल्पसंख्याकांविरोधात आतापर्यंत ६४५ घटनांची नोंद झाली. सोशल मीडियावर हिंदू समाज व इस्कॉनला लक्ष्य करून प्रक्षोभक मजकूर प्रसारित केला जात आहे.

स्थानिक सभांत अल्पसंख्याकांचा सामाजिक बहिष्कार करण्याची व त्यांच्या संघटनांवर बंदीची मागणी होत आहे. अनेक ठिकाणी हिंदूंना धमक्याही देण्यात आल्या.मानवी हक्क संघटनांच्या माहितीनुसार हिंदूंच्या जमिनी बळकावण्याच्या १३२ घटना समोर आल्या. अनेक कुटुंबांनी घरातून हाकलून देण्याच्या धमक्या , घरांची तोडफोड झाल्याच्या तक्रारीही नोंदवल्या आहेत. ९५ मंदिरांची तोडफोड आणि विटंबनेच्या घटनाही समोर आल्या आहेत.

मोठ्या कटाची शक्यता… जाहीर धमक्या,कोणत्याही क्षणी परिस्थिती बिघडणे शक्य

कुमिल्ला येथील रहिवासी नंदित कुमार यांच्या मते, हिंदूंविरोधी वातावरण सर्वाधिक प्रमाणात सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार केले जात आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कटकारस्थानाचा संशय निर्माण करणारे संदेश व पोस्ट सातत्याने प्रसारित होत आहेत. अशा प्रकारच्या सामग्रीवर त्वरित नियंत्रण आणले नाही तर परिस्थिती कधीही बिघडू शकते. गाइबांधा येथील स्थापना हा मोठ्या राजकीय कारस्थानाचा भाग असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

प्रशासकीय निष्क्रियता

मानवी हक्क संघटनांचा आरोप आहे की प्रशासनाकडून पुरेशी व प्रभावी कारवाई होत नसल्यामुळे अल्पसंख्याक समाजात असुरक्षिततेची भावना वाढली. त्यांचा विश्वासही ढळत आहे.

भगवान श्रीरामांच्या मूर्ती प्रकल्पावर निर्णय नाही

गाइबांधा जिल्ह्यातील पलाशबारी येथील प्राचीन राधागोबिंद मंदिरात ८१ फूट उंच भगवान श्रीरामांची मूर्ती उभारण्याच्या प्रस्तावाला स्थानिक कट्टरपंथी गटांनी विरोध केला. त्यानंतर इस्लामी आंदोलोन, खेलाफत मजलिस आणि जमात-ए-इस्लामीशी संबंधित नेत्यांनीही या विरोधाला पाठिंबा दिला. १९ व २० जून रोजी हिंदू संघटनांनी या निर्णयाच्या निषेधार्थ देशभर शांततापूर्ण आंदोलने केली

अल्पसंख्याकांच्या ८ सूत्री मागण्यांवर प्रगती नाही

बांगलादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन ओइक्या परिषदेचे सरचिटणीस मोनिंद्र कुमार नाथ यांच्या मते, कोणत्याही समुदायासाठी केवळ प्रत्यक्ष हिंसाचारच नव्हे, तर सातत्याने दिल्या जाणाऱ्या धमक्याही भीतीचे मोठे कारण ठरतात. उघडपणे धमक्या देणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास कमी होतो.

मुलांच्या भवितव्याची चिंता वाटते- उद्योजिका

रंगपूरमधील एका हिंदू महिला उद्योजिकेने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना रोज सोशल मीडियाचा वापर करावा लागतो. फेसबुकवर सतत दिसणाऱ्या जातीय टिप्पण्या आणि पोस्टमुळे त्यांची चिंता वाढत आहे. भविष्यात या वातावरणात मुलांची सुरक्षितता कितपत राहील, याची त्यांना भीती वाटते.

  • बांगलादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन ओइक्या परिषद, मायनॉरिटी ओइक्या मोर्चा या अल्पसंख्याक संरक्षण कायदा, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, देवोत्तर मालमत्ता संरक्षण कायद्यासारख्या मागण्या आहेत.
  • जून २०२६ पर्यंत या मागण्यांवर ठोस प्रगती झालेली नाही. कायदेशीर व संरक्षणाच्या अभावाने मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची अल्पसंख्याक समाजात अधिक बळावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत