Headlines

Yavatmal Crime: सात वर्षीय बेपत्ता मुलीची शेजाऱ्याच्या घरात आढळली बॉडी; पोलिसांनी दोन भावांना केली अटक – missing 7 yrs old girl body found in neighbors house in yavatmal police arrest two brothers


Yavatmal Crime: सात वर्षीय बेपत्ता मुलीचा मृतदेह शेजारच्या घरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन भावांना अटक केली.

yavatmal crime
बेपत्ता मुलीचा मृतदेह शेजारच्या घरात आढळला(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: दारव्हा तालुक्यातील बोथ येथील सात वर्षीय मुलगी शुक्रवारी बेपत्ता झाली. आईवडील, नातेवाईक, गावकरी आणि पोलिसांनी शोध घेतला पण पत्ता लागला नाही. शनिवारी मुलीचा मृतदेह शेजारच्या घरात पोत्यात बांधून ठेवलेल्या अवस्थेत मिळाल्याने गाव हादरले आहे. शिवानी पंकज जाधव असे मृत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी शेजारी कैलास जाधव व सोनू जाधव या दोन भावांना ताब्यात घेतले.

बोथ गावात पंकज जाधव व कैलास जाधव हे अनेक वर्षांपासून शेजारी राहत आहे. कैलासची मुलगी व शिवानी या दोघी मैत्रिणी असल्याने शिवानी त्यांच्या घरीच खेळण्यास जात असे. शनिवारी शिवानी सकाळी खेळायला गेली , पण बराच वेळ झाला तरी घरी परत आली नाही . शेजारच्या घरी खेळत असेल म्हणून तिच्या आईवडिलांनी लक्ष दिले नाही. पण दुपार झाल्यानंतरही ती घरी न आल्याने तिचा शोध सुरू केला.

Maharashtra TimesPalghar Accident : भरधाव वाहनाची बाईकला धडक, तिघांचा जागीच मृत्यू; त्रिकोणी कुटुंबाचा क्षणार्धात करुण अंत
दारव्हा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोध सुरू केला. यवतमाळ जिल्हा पोलिसांनी तिचा शोध घेणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले. शनिवारी शिवानीचा शोध सुरू असताना शेजारच्या घरात तिचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत मिळाला.

Maharashtra TimesNeeraj Jadhav : अशोक खरात प्रकरण; सगळं कांड ज्याच्यामुळे उघड, त्या ‘मास्टरमाइंड’ नीरज जाधवचा फोटो समोर
नाकातील रिंगमुळे हत्या ?
शिवानीच्या नाकातील दीड ते दोन ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगमुळे तिची दोघा भावांनी गळा दाबून हत्या केल्याचा संशय आहे. शवविच्छेदन झाल्यावर हत्येचे खरे कारण समोर येईल. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढू शकते असे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी सांगितले.

चौदावर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली मृत्यू
नागपूर : रेतीने भरलेल्या ट्रॅक्टरखाली दबून १४वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना नवीन कामठीतील उनगाव आरोडा येथे घडली. अजब कलब मोहासे असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अजय याचे वडील कलब हे मूळ काला ता. आमला येथील रहिवासी असून काही दिवसांपूर्वीच ते कामनिमित्त आरोडा रेती घाट येथे राहायला आले. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास रेतीघाट परिसरात वाळूने भरलेला ट्रॅक्टर उलटला. त्याखाली दबून अजय जखमी झाला. कलब यांनी त्याला शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा