Headlines

Buldhana Missing Girl Shivani Kalmikar Police arrests Brother Father in Death Case Mysterious Twist within month Crime News; बेपत्ता मुलीला पोलिसांनी ‘मृत’ ठरवलं, बाप-भावाला तुरुंगात डांबलं, शिवानी अचानक ‘जिवंत’ परतली, म्हणाली…


Buldhana Girl Death Case : पोलिसांनी तपास करताना कोणतीही डीएनए चाचणी किंवा वैज्ञानिक पुष्टी न करता, केवळ प्राथमिक माहितीच्या आधारे ती बॉडी शिवानीचीच असल्यावर शिक्कामोर्तब केले.

Buldhana Shivani Kalamikar Death Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा/अमरावती : ज्या मुलीला मृत मानून तिच्या हत्येच्या आरोपाखाली वडिलांना आणि भावाला तुरुंगात डांबण्यात आले, तीच मुलगी अचानक जिवंत परतली आहे. या नाट्यमय खुलाशानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र पोलिस प्रशासनात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

लग्नानंतर अचानक तरुणासोबत बेपत्ता

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात धारणी तालुक्यातील खारिया टेंभ्रू येथील रहिवासी असलेल्या शिवानी कलमीकर हिचा विवाह मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील खडकी गावात झाला. त्यानंतर २४ एप्रिल रोजी शिवानी ही अरुण नावाच्या युवकासोबत अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी याबाबत १ मे रोजी मध्य प्रदेशातील खकनार पोलिसांत ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

डीएनए टेस्ट न करताच निष्कर्ष

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद परिसरात एका अज्ञात महिलेचा शीर नसलेला, जळालेल्या अवस्थेतील बॉडी आढळली. शवाची ओळख पटवणे कठीण होते. जळगाव जामोद पोलिसांनी तपास करताना कोणतीही डीएनए चाचणी किंवा वैज्ञानिक पुष्टी न करता, केवळ प्राथमिक माहितीच्या आधारे ती बॉडी शिवानीचीच असल्यावर शिक्कामोर्तब केले.
Maharashtra TimesNida Khan : तुमच्या नव्या घरी एक गरोदर पाहुणी ठेवायची आहे, पटेलचा फोन; ‘त्या’ सकाळी हनिफभाईची बायको स्वतःचंच घर टीव्हीवर पाहून म्हणाली…

बाप आणि भावाला अटक

एवढ्यावरच न थांबता पोलिसांनी तडकाफडकी कारवाई करीत शिवानीचे वडील बापुराम कलमीकर आणि भाऊ अजय यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक करीत त्यांची रवानगी थेट बुलढाणा कारागृहात केली.

Sanjay Shirsat | संजय राऊतांचा जीव ना ठाकरे ना पवारांमध्ये मग कुणामध्ये? शिरसाट स्पष्टच बोलले

शिवानी स्वतःच पोलिसांसमोर हजर

मात्र, अचानक शिवानी ही स्वत: अरुणसोबत खकनार पोलिसांसमोर हजर होताच या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले. ‘मी जिवंत आहे. माझे वडील आणि भाऊ निर्दोष आहेत. त्यांची सुटका करा’, अशी मागणी तिने करताच पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पोलिसांच्या या अतिघाईमुळे दोन निष्पाप व्यक्तींना विनाकारण कारागृहात राहावे लागले.
Maharashtra TimesPune News : एकाच दिवशी एकाच परिसरात सात जणांचा अकस्मात मृत्यू, पुण्याच्या दापोडीत खळबळ, गावठी दारुची अफवा पोकळ, कारण काय?

ती बॉडी कुणाची?

डीएनए रिपोर्ट न घेता पोलिसांनी हत्येचा गुन्हा कसा नोंदवला?, निष्पाप बाप-लेकाच्या बदनामीला आणि त्यांनी तुरुंगात घालवलेल्या दिवसांना जबाबदार कोण, शिवानी जिवंत आहे, तर जळगाव जामोदमध्ये सापडलेला छिन्नविच्छिन्न बॉडी नेमकी कुणाची, असे गंभीर प्रश्न आता निर्माण केले जात आहेत.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा