Headlines

Nanded Wife Killed Husband Over Immoral Relationship Buries Body in Farm; अनैतिक संबंधात पती अडसर, प्रियकरासोबत पत्नीने रचला प्लॅन, ‘दृश्यम’ स्टाईल नवऱ्याला संपवलं; पोलीस तपासात मोठा उलगडा


Nanded Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

Nanded Wife Kills Husband
अनैतिक संबंधातून पत्नीकडून पतीची हत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : चित्रपटातील कल्पनेलाही लाजवेल अशी एक थरारक आणि सुन्न करणारी घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा पत्नीने दगडाने डोकं ठेचून निर्घृणपणे खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह शेतात नेऊन पुरला. धक्कादायक म्हणजे कोणालाही संशय येऊ नये म्हणून पत्नीने घटनेच्या 21 दिवसानंतर पोलीस ठाण्यात जाऊन पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी तपासाची चक्री फिरवत कौशल्यपूर्ण आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर हत्याकांडाचा उलघडा केला. मरखेल पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. या ‘दृश्यम’ स्टाईल हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देगलूर तालुक्यातील आमदापुर येथील रहिवासी रामकिशन गंगाधर गोलेवार (वय 55, रा. एकुर्का रोड, ता. उदगीर, जि. लातूर) हे मागील 25 एप्रिलपासून बेपत्ता होते. त्यांची पत्नी देवशाला रामकिशन गोलेवार यांनी 17 मे रोजी मरखेल पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला हे प्रकरण पोलिसांना केवळ मिसिंगचे वाटत होते. मात्र, तपासादरम्यान अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या आहेत. रामकिशन यांची पत्नी देवशाला गोलेवार हिचे गावातील सुभाष व्यंकन्ना यतरवाड याच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दोघांचे मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासले असता सतत संपर्कात असल्याचं उघड झालं. चौकशीदरम्यान पत्नीच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या.
Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar Kadepathar : छ.संभाजीनगरमधील ‘कडेपठार’ला येणार झळाळी, राज्य पुरातत्त्व विभागाकडून संवर्धनाचा प्रस्ताव तयार

कसून चौकशी केल्यावर हत्येची कबुली

दरम्यान, रामकिशन बेपत्ता झाल्यानंतर संशय येऊ नये म्हणून देवशाला आणि सुभाष यांनी फोनवरील संपर्क बंद केला होता. तपास अधिक खोलात नेत पोलिसांनी तांत्रिक पुरावे, स्थानिक गुप्त माहिती, साक्षीदारांचे जबाब आणि परिस्थितीजन्य पुरावे यांची सांगड घातली. अखेर पोलिसांनी देवशाला गोलेवार हिची कसून चौकशी केली असता तिने पती रामकिशन गोलेवार यांचा प्रियकर सुभाष यतरवाड याच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. आरोपींच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी दाखवून दिलेल्या ठिकाणी उत्खनन करून मृतदेहाचे अवशेष, मानवी सांगाडा तसेच अन्य पुरावे हस्तगत केले.
Maharashtra TimesPune Crime : सगळ्यांसमोर ‘अंकलजी’ म्हणा, खोलीत ‘महाराज’ बोला! पुण्यातील भोंदूचा पर्दाफाश, 12 हजार चौ फुटांवर आलिशान बंगला, भुयार खोदण्याचा प्रयत्न
घटनास्थळावरून खुनात वापरलेला दगड, कपडे आणि डीएनए नमुनेही जप्त करण्यात आले. याप्रकरणी मरखेल पोलीस ठाण्यात गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम 103, 238 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी देवशाला रामकिशन गोलेवार (वय 40) व सुभाष व्यंकन्ना यतरवाड (वय 45) यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा