Hingoli case filed on shivsena mla santosh bangar during local body election; ऐन निवडणुकीत शिंदेंचा शिलेदार अडचणीत; आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल
Hingoli case filed on shivsena mla santosh bangar during local body election; ऐन निवडणुकीत शिंदेंचा शिलेदार अडचणीत; आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल
मुंबई: राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे अडचणीत आले आहेत. मतदान केंद्रात मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा व आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप बांगर यांच्यावर झाला असून याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बांगर यांना फटकारलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक 3 येथे संतोष बांगर मतदानासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी एका महिला मतदाराला ईव्हीएमवर कोणतं बटन दाबायचं, याबाबत सांगितलं. इतकंच नाही, तर मतदान केंद्रात “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो” व “एकनाथ शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं” अशी घोषणाबाजीही केल्या. तसंच बांगर यांनी मोबाईल फोनचा वापरही केला. मतदान केंद्रात घोषणाबाजी करणे, फोन वापरणे किंवा मतदाराला मतदानाविषयी सूचना देणं, हे मतदानाच्या गोपनीयतेचा भंग व आचारसंहितेचं गंभीर उल्लंघन मानलं जातं. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत होती.
आमदार संतोष बांगर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचं आढळल्यास आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असा अहवाल मागवण्यात आला होता. आता या प्रकरणात आमदार संतोष बांगर यांना मोठा धक्का बसला असून, त्यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष बांगर यांना कठोर शब्दांत सुनावले. ते म्हणाले, “किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे. निवडणुकीत आपण कसं वागतोय, आपण कोणता संदेश देतोय याचा विचार केला पाहिजे,” असे खडेबोल मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुनावले आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा