![]()
धाडिंगच्या शाळेतील इयत्ता दुसरीचे विद्यार्थी पुरातून थोडक्यात बचावले. पाणी वेगानं आत येत असताना शिक्षकांनी त्यांना तातडीनं वर्गाबाहेर जाण्याच्या सूचना केल्या. ‘पूर आलेला आहे. तुम्ही दप्तरं आणि जेवणाचे डबे इथेच ठेवायला हवेत. आपण सुरक्षेला प्राधान्य द्यायला हवं, असं शिक्षकांनी मुलांना सांगितलं होतं,’ असं एका विद्यार्थ्याच्या पालकांनी सांगितलं. .शिक्षकांच्या समयसूचकतेमुळे शाळेचे बहुतांश विद्यार्थी सुरक्षित राहिले.
शाळेतील बाक, भिंती आणि वह्या चिखलात बुडाल्या. शाळेच्या अंगणातही राडारोडा आणि चिखल पाहायला मिळत आहे. भिंतींकडे पाहिल्यावर पाणी किती वेगानं आणि कुठपर्यंत आलं होतं, याचा अंदाज बांधता येतो. बाकांवर आणि फरशीवर चिखलानं माखलेल्या लहान-लहान दप्तरांचा ढिग पाहायला मिळतो. एका विद्यार्थ्याची आई शाळेत तिच्या लेकाचं दप्तर शोधायला आली नव्हती. पण तिला दप्तर सापडलं नाही. पण तिचा मुलगा सुरक्षित आहे. त्याबद्दल तिनं आनंद व्यक्त केला.
सेव्ह द चिल्ड्रन नावाच्या एका एनजीओनं दिलेल्या माहितीनुसार, पुराचा जबर फटका बसलेल्या जिल्ह्यांमधील किमान ६९ शाळा पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. यामुळे जवळपास १९ हजार विद्यार्थ्यांचं शिक्षण संकटात सापडलं आहे. बचाव पथकं जसजशी या भागांमध्ये पोहोचतील, तसतसा शाळांचा आकडा वाढत जाईल.
देशाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या भीषण पूर आणि भूस्खलनानंतर सरकारनं शाळा आणि महाविद्यालयं तीन दिवसांसाठी बंद करण्याचा आदेश दिला आहे. विद्यापीठांच्या परीक्षादेखील थांबवण्यात आल्या आहेत. अनेक भागांना आताही पुराचं पाणी वाढत असल्यानं सतर्कतेच्या सूचना मिळत आहेत. उंच आणि सुरक्षित भागांमध्ये सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे शाळा सुरू होण्यास अजून बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे.
नेपाळमधील पुरात ९०३ जणांचा मृत्यू झाला असून ४ हजार २४७ जण अद्यापही बेपत्ता आहेत. तर चीनच्या तिबेटमध्ये १६ जण दगावले आहेत. तिबेटमध्ये भीषण पुरानंतर ५४६ जण बेपत्ता झाले आहेत.
