Headlines

Gold Price Prediction 2026; गोल्ड रेट कमी होण्याची वाट बघताय? भाव 1 लाखाच्या खाली येणार की नाही, 3 फॅक्टर्स ठरवतील भविष्याची चाल


Gold Price News: सोन्याच्या दरांना सलग दुसऱ्या दिवशी उतरती कळा लागली आहे. शुक्रवारी फेडचे अध्यक्ष केविन वॉर्श यांनी महागाईवर कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिल्यानंतर गुंतवणूकदार आता नफा बुक करू लागले असून यामुळे शुक्रवारी पिवळसर धातूची झळाळी 2-3% घसरणीसह क्लोज झाल्या तर सोमावर, 31 ऑगस्ट रोजी, सोन्याची किंमत 1% घसरणीसह व्यवहार करत आहे.

सोन्याच्या दरांना उतरती कळा

28 ऑगस्ट रोजी COMEX वर सोन्याचा दर $4,678 प्रति औंसवर पोहोचला होता, पण नंतर सततच्या घसरणीमुळे $4,512 वर आले. तसेच एकाच ट्रेडिंग सत्रात सोन्याच्या दरात 3.56% घसरण झाली. या दरम्यान, MCX वरील ऑक्टोबरचा वायदा 1.63% घसरून 1,56,400 रुपयांवर आला. त्यामुळे आता तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर येत्या काही दिवसांतील सोन्याच्या अपेक्षित किमतीचा विचार करा.

Maharashtra TimesShare Market मध्ये गुंतवणूकदारांचे 49 लाख कोटी राख, TATA मुळे सर्वाधिक घाटा; IT स्टॉक्सची उतरली मिजास, आता काय करावं?

सोन्याच्या किंमतीत पुढे काय होणार?

शुक्रवारी फेडरल रिझर्व्हने नरम कमी कठोर संकेत दिल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा बुक केला, ज्यामुळे जागतिक बाजारात सोन्यावर दबाव आला. तसेच आता पुढील काही दिवसांत अमेरिकेची रोजगारविषयक आकडेवारी, डॉलरमधील हालचाल आणि रुपयाचे अवमूल्यन सोन्याच्या किमतींसाठी महत्त्वाचे घटक ठरतील. रुपयाचे अवमूल्यन देशांतर्गत सोन्याच्या किमतींना काही प्रमाणात आधार देऊ शकते, तर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि बॉण्डवरील वाढलेले उत्पन्न सध्या दबाव आणतील.

देशांतर्गत बाजारात रुपयाची हालचाल निर्णायक फॅक्टर ठरेल. रुपया कमजोर राहिल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरांमधील घसरणीचा MCX वरील परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतो. या दरम्यान, जागतिक बाजारात शुक्रवारी आधीच मोठी घसरण झाली आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी 3% घसरण होईल असे मानणे चुकीचे ठरेल. सध्या पश्चिम आशियातील परिस्थितीत थंड झाली आहे पण, आठवड्याभरातील कोणताही नवीन भू-राजकीय तणाव किंवा आर्थिक घडामोडींमुळेही बाजाराच्या परिस्थितीत बदल होऊ शकतो.

Maharashtra TimesSeptember Bank Holiday 2026: सप्टेंबर महिन्यात बँकांना भरपूर सुट्ट्या; बँक युनियनचा 3 दिवस संपही जाहीर, काम अडकू नये यासाठी हॉलिडे लिस्ट पाहा

सोन्याच्या किंमतीसाठी महत्त्वाचे ट्रिगर

सोन्याच्या किमतीत सध्या करेक्शन होत असल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने म्हटले. अलीकडेच सोन्याने 1.63-1.66 लाखांवर उसळी घेतलेली ज्यामुळे गुंतवणूकदारांनी नफा कमावला, पण सोन्याच्या किमती 20 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजवर असल्याने तेजीच्या ट्रेंडचा शेवट मानला जात नाही.

1.54-1.55 लाख ही लेव्हल निर्णायक असेल, असे तज्ज्ञ म्हणतात. तसेच या रेंजमध्ये खरेदी परतल्यास सोन्यामध्ये तेजीचा कल परतू शकतो पण, ही रेंज तुटल्यास किमतींमध्ये आणखी घसरण होऊ शकते, जी लवकरच होईल असं निश्चित नाही.

Maharashtra TimesGratuity Calculator: 10 वर्षे 9 महिने नोकरी अन् 30,000 रुपये बेसिक सॅलरीवर नोकरी सोडल्यानंतर हातात येतील लाखो रुपये, असं आहे Calculation

सोन्यासाठी महत्त्वाचे फॅक्टर्स

आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला गोल्ड मार्केटचे लक्ष अमेरिकेतील आगामी रोजगारविषयक आकडेवारीकडे लागून असेल, ज्यामध्ये नॉन-फार्म पेरोल्स, बेरोजगारीचा दर आणि ADP रोजगार आकडेवारीचा समावेश असेल. डॉलर कमकुवत होत राहिला तर सोन्याला काही प्रमाणात आधार मिळू शकतो, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

पण रुपया कमजोर झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात MCC गोल्डला आधार मिळू शकतो. सध्या वाढत्या क्रूडच्या किंमती आणि वाढलेल्या बॉण्ड यील्ड्समुळे मौल्यवान धातूंवर दबाव आला आहे, पण आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत भारतातील सोन्याच्या किमतीतील घसरण मर्यादित असू शकते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत