उत्तर महाराष्ट्रात भाजपचा पाया मजबूत करणारे, विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून सरकारला सळो की पळो करून सोडणारे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात एकाच वेळी १२ खात्यांचा कारभार सांभाळणारे जेष्ठ नेते म्हणजे एकनाथराव खडसे. खडसेंनी आपल्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने भूतकाळातील सर्व राजकीय वैर आणि मतभेद विसरून भाजप नेत्यांसमोर मैत्रीचा हात पुढे केला होता. मात्र, सोहळ्याच्या दिवशी चित्र पूर्णपणे वेगळे दिसले. भाजपच्या एकाही वरिष्ठ नेत्याने या सोहळ्याला हजेरी लावली नाही. फडणवीस आले नाहीत, गिरीश महाजन यांनी अंतर राखले, तर दुसरीकडे शरद पवारांच्या जाहीर कौतुकाने सोहळा गाजला. नेमके काय घडले? भाजप नेत्यांनी खडसेंचा हा मैत्रीचा हात का झटकला? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊय़ात..