Headlines

एकनाथ शिंदेंना काळे झेंडे दाखवत मराठा कार्यकर्त्यांचा गोंधळ, माइकही बंद; थोडक्यात भाषण गुंडाळलं – maratha activists protest eknath shinde in parbhani



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा विरोध झुगारून खासदार संजय जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परभणीत मेळावा घेतलाच. खबरदारी म्हणून आधीच मंचावर सुरक्षा वाढवण्यात आली होती. पण तरीही संतापलेल्या मराठा कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंच्या या परभणीतील सभेत गोंधळ घातला. शिंदेंचं भाषण सुरू असतानाच काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. मात्र शिंदेंनी सगळे आपलेच आहेत, असं म्हणत परिस्थिती हातळण्याचा प्रयत्न केला. तर काही वेळाने शिंदेंचा माइक सुद्धा बंद पडला. ज्यामुळे शिंदेंनी भाषणच आटोक्यात घेतलं.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत