Headlines

EV Charging Housing Society Rules; सोसायटीत EV गाड्या चार्जिंगला लावता येतात का? सोसायट्यांच्या मर्यादा अन् तुमचे अधिकार समजून घ्या


Society NOC for EV Charging: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणाविषयीची चिंता लक्षात घेता, आजकाल इलेक्ट्रिक वाहने अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. लोक मोठ्या प्रमाणावर EVs ची निवड करत आहेत, पण ईव्ही कार किंवा दुचाकी खरेदी करण्यापूर्वी बहुतेक लोकांना प्रश्न पडतो की गृहनिर्माण सोसायटीमधील पार्किंग स्लॉटमध्ये ईव्ही चार्जर बसवता येते का? तुम्हालाही चिंता वाटत असेल, तर ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.

सोसायटीमध्ये ईव्ही चार्जिंग बसवण्याचे नियम

सरकारी नियमांनुसार, तुमच्याकडे तुमची स्वतःची नेमून दिलेली पार्किंगची जागा असेल, तर तुम्ही तिथे ईव्ही चार्जर बसवू शकता. ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तुमची सोसायटी तुम्हाला EV चार्जिंग पॉईंट लावण्यास सरळ नकार देऊ शकत नाही.तुम्ही तुमच्या घरातील मीटर वापरून किंवा वेगळे मीटर लावून चार्ज करू शकता आणि यासाठी फक्त योग्य कार्यपद्धतीचे पालन केले पाहिजे.

Maharashtra TimesHDFC Bank सीईओच्या शर्यतीत कैझाद भरुचा आघाडीवर? जगदीशन यांनी पुनर्नियुक्तीस नाकारल्याने उत्तराधिकारी निवडीला वेग, गुंतवणूकदारांचेही लक्ष

अडीच वर्षांच्या लढ्यानंतर अखेर विजय मिळाला

आपल्या देशात अशाच प्रकारचं एक प्रकरण समोर आलं जिथे रक्षित सोमानी नावाच्या व्यक्तीने अडीच वर्षांपूर्वी 1 कोटी रुपये किमतीची मर्सिडीज-बेंझ EQB खरेदी केली होती. पण गृहनिर्माण सोसायटीने सुरक्षेचा हवाला देऊन पार्किंग लॉटमध्ये चार्जर बसवण्यासाठी NOC दिले नाही. हा लढा बराच काळ चालला, पण अखेरीस कोर्टाने चार्जर बसवायची परवानगी दिली. या व्यक्तीला सार्वजनिक चार्जर वापरण्यास भाग पडले, ज्याचा खर्च 3.5 ते 4 रुपये प्रति किमी, तर घरी फक्त 1.5 रुपये प्रति किमी खर्च पडतो.

या प्रकरणात EV चार्जरमुळे सुरक्षेचा धोका, विशेषतः कमी वीजभार असलेल्या जुन्या इमारतींमध्ये आणि तळघरात आग लागण्याच्या शक्यतेमुळे निर्माण होऊ शकतो, असा सोसायटीने युक्तिवाद केला. पण रक्षित सोमानी यांनी याला प्रत्युत्तर म्हणून सांगितले की त्यांच्याकडे आधीपासूनच कंपनी-मान्यताप्राप्त मर्सिडीज-बेंझ EQB चार्जर, योग्य वायरिंग आणि वीज मंडळाची परवानगी होती, त्यामुळे थांबवणे अन्यायकारक होते.

सोसायटी कधी EV चार्जिंगला मना करू शकते

इमारतींमध्ये विजेची क्षमता मर्यादित असते तर, बेसमेंटमध्ये चार्जिंग केल्यास आगीचा धोका निर्माण होऊ शकतो आणि जुन्या वायरिंगवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. या कारणांमुळे, सोसायट्या पार्किंग लॉटमधील ईव्ही चार्जरला विरोध करू शकतात.

अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये ईव्ही चार्जिंग पॉईंट लावायचे असेल तर, काही महत्त्वाच्या स्टेप्स फॉलो केल्या पाहिजे.

  • सर्वप्रथम तुमच्या सोसायटी व्यवस्थापनाकडे लेखी अर्ज सादर करा. काही राज्यांमध्ये 7 दिवसांच्या आत NOC जारी करणे आवश्यक असते.
  • EV चार्जिंगसाठी स्वतंत्र मीटर बसवल्याने सोसायटीच्या भारावर परिणाम होणार नाही आणि बिलिंग करणेही सोपे होईल.
  • केवळ कंपनी-प्रमाणित चार्जरच बसवा, चांगल्या दर्जाची वायरिंग आणि एमसीबी (सर्किट संरक्षण) वापरा.
  • ओव्हरलोडिंग टाळा आणि अग्निसुरक्षा नियमांचे पालन करा.
  • ईव्ही चार्जिंग पॉईंट बसवण्याचा खर्च सहसा तुम्हालाच उचलावा लागतो.

सोसायटी विजेच्या भाराबद्दल चिंता व्यक्त करू शकतात, पण थेट नकार देऊ शकत नाही. तुमच्याकडे योग्य स्थापना, मंजुरी आणि सुरक्षा उपाययोजना असतील, तर तुम्ही ईव्ही चार्जर बसवू शकता.