Headlines

Puneet Gupta AstroTalk Success Story; ज्योतिषशास्त्र भ्रामक कल्पना वाटायच्या, मग एका भविष्यवाणीनं बदललं अख्खं आयुष्य अन् पुनीत बनला 10 हजार कोटींच्या ॲस्ट्रो कंपनीचा मालक

Astrology Success Story: आपल्या देशात असंख्य लोक ज्योतिषशास्त्राला मानतात. पण प्रोफेशनल अभियंता पुनीत गुप्ता यांचा त्यावर अजिबात विश्वास नव्हता. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की पुनीत गुप्ता यांनी त्यातूनच आपलं करिअर घडवलं आणि युनिकॉर्न बनला.

Puneet Gupta AstroTalk Success Story
पुनीत गुप्ता यांची ॲस्ट्रोटॉक यशोगाथा
Unicorn Start-up Success Story: तुम्ही ज्योतिषशास्त्र मानत असाल तर तुम्ही Astrotalk बद्दल नक्कीच ऐकले असेल. पण 9500 कोटींचे साम्राज्य कोणी आणि कसे उभारले कदाचितच तुम्हाला माहिती असेल. 2011 मध्ये चंदीगडमधील एका कॉलेजमधून इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर पदवीधर पुनीत गुप्ता यांनी 37000 रुपयांची नोकरी धरली आणि त्यानंतर आपल्या मित्रांसोबत कंपनी सुरू केली, जी दोन वर्षांतच बंद पडली. पण पहिला बिझनेस ठप्प पडल्यानंतर ॲस्ट्रोटॉकची कहाणी सुरू झाली आणि 9500 कोटींचे साम्राज्य उभे राहिले.

एक भविष्यवाणी खरी ठरली अन् आयुष्य बदललं

एक भविष्यवाणी खरी ठरली अन् आयुष्य बदललं

ही आहे ॲस्ट्रोटॉकचे संस्थापक पुनीत गुप्ता यांची कहाणी आहे. एका ज्योतिषाने भविष्यवाणी केल्यावर पुनीत गुप्ताच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पुनीत गुप्ता यांनी स्वतः सांगितले की, 2015 मध्ये ज्योतिषी मित्राने भविष्यवाणी केली होती की लवकरच एक कंपनी सुरू करतील, पण कंपनी दोन वर्षांच्या आत बंद पडेल.

ज्योतिष मित्राचे भाकीत खरे ठरले

ज्योतिष मित्राचे भाकीत खरे ठरले

ज्योतिषाचे भाकीत ऐकून पुनीत यांचा विश्वासच बसला नाही आणि सगळं फ्रॉड वाटलं. पण काही दिवसांतच ज्योतिषी मित्राचे पहिले भाकीत खरे ठरले. एप्रिल 2015 मध्ये पुनीतने CodeYeti नावाची कंपनी सुरू केली आणि इथून पुनीतचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास बसू लागला. 2017 मध्ये पुनीतचा अल्पसा विश्वास पूर्ण सत्य आणि श्रद्धेत बदलला. कारण 2015 मध्ये सुरू केलेली कंपनी 2017 मध्ये बंद पडली. म्हणजेच CodeYeti चा खेळ संपला होता.

ज्योतिषशास्त्र स्टार्टअप सुरू केले

ज्योतिषशास्त्र स्टार्टअप सुरू केले

CodeYeti नंतर पुनीत गुप्ताच्या खात्यात 80 लाख रुपये होते, पण कंपनी ठप्प झाल्यानंतर पुन्हा त्याच्या ज्योतिष मित्राची आठवण झाली. ज्योतिषशास्त्र खरोखरच एखाद्या व्यक्तीचे भविष्य सांगू शकते याची आता त्यांना पूर्ण खात्री पटलेली त्यामुळे, त्यांनी याच कल्पनेवर काम सुरू केले. पहिला स्टार्टअप बंद झाल्यावर पुनीत गुप्तानी उरलेले 80 लाख रुपये एका आगळ्यावेगळ्या आयडियामध्ये गुंतवले. ज्योतिषशास्त्र खरे ठरल्यानंतर ऑक्टोबर 207 मध्ये Astrotalk नावाचे ज्योतिष व्यासपीठ सुरू केले.

सुमारे 10,000 कोटींच्या साम्राज्याचे मालक

सुमारे 10,000 कोटींच्या साम्राज्याचे मालक

नोएडा-स्थित Astrotalk मध्ये 100 हून जास्त कर्मचाऱ्यांसह ESOP बायबॅकद्वारे भारतातील युनिकॉर्न स्टार्टअप क्लबमध्ये एन्ट्री घेतली. ॲस्ट्रोटॉकचे सध्याचे मूल्यांकन सुमारे 9500 कोटी रुपये आहे, म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या जोरावर पुनीत गुप्ता यांनी 10,000 कोटींचे साम्राज्य उभारले आहे.

ॲस्ट्रोटॉक कंपनी नफ्यात

ॲस्ट्रोटॉक कंपनी नफ्यात

ॲस्ट्रोटॉक वेबसाइटनुसार प्लॅटफॉर्मवर आता 13000 हून अधिक ज्योतिषी आणि दररोज 1 लाख मिनिटांपेक्षा जास्त सल्ला देतात. ॲस्ट्रोटॉककडे आध्यात्मिक दागिने, रुद्राक्ष, पायराइट, वास्तु, धन योग आणि ग्रह व मूलतत्त्वांशी संबंधित उत्पादनांसाठी स्वतंत्र श्रेणी आहेत. ॲस्ट्रोटॉक सध्या नफ्यात असून आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीने 1,176 कोटींचा महसूल कमवला. कंपनीने करपूर्व नफा 285 कोटी नोंदवला असताना सध्याचा महसूल रन रेट 2500 कोटींहून अधिक आहे.

पुनीत गुप्ताची नेटवर्थ किती

पुनीत गुप्ताची नेटवर्थ किती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ॲस्ट्रोटॉक संस्थापक पुनीत गुप्ता यांची अंदाजित एकूण संपत्ती सुमारे 1000 कोटी ते 1800 कोटी रुपये दरम्यान ($120M–$195M) आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा