Headlines

Manoj Jarange Hunger Strike: जात पडताळणी समित्या बरखास्त करा; नव्या मागणीसाठी मनोज जरांगेंकडून 12 सप्टेंबरपर्यंत मुदत – manoj jarange sets deadline of 12 sept for new demand to immediately disband caste certificate scrutiny committees


म. टा. प्रतिनिधी, जालना : जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या तातडीने बरखास्त करण्यात याव्यात,’ अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. ‘सरकारने १२ सप्टेंबरपर्यंत सर्व मागण्यांची अंमलबजावणी न केल्यास मराठा समाज मुंबईत येईल,’ असा इशारा त्यांनी दिला. ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रे पडताळणीसह द्यावीत यासह विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत शनिवारपासून जरांगे यांचे उपोषण सुरू झाले. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. शुक्रवारी रात्रीपासूनच मराठा बांधव मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत दाखल झाले. जरांगे यांचे गेल्या तीन वर्षांतील हे ११ वे उपोषण आहे.

‘समाज संपला, तर आपण संपतो. संकटाच्या काळात समाजाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. आता आपण विजयाच्या उंबरठ्यावर आहोत, मागे हटायचे नाही. एकही मागणी अमान्य राहू देणार नाही,’ असे ते म्हणाले.

Maharashtra TimesSanjay Raut: सिंहस्थात 25 हजार कोटींची उधळपट्टी, संजय राऊत यांचा मंत्री-अधिकाऱ्यांवर आरोपअंतरवाली सराटीत अन्नछत्र उभारण्यात आले आहे, आंदोलनासाठी येणाऱ्या मराठा बांधवांच्या जेवणाची व्यवस्था येथे आहे. चटण्या, ठेचा, लोणची, पोळी भाजी आणि भाकरीची व्यवस्था परिसरातील गावकऱ्यांनी श्रमदानातून उभारली आहे. रात्री सामूहिक कीर्तनाचे कार्यक्रम आहेत. उपस्थित मराठा आंदोलकांनी ‘मुंबई चलो’च्या घोषणा दिल्या.

जरांगे यांच्या प्रमुख मागण्या

शिंदे समितीने शोधलेल्या ५८ लाख कुणबी नोंदींच्या आधारे अर्ज केलेल्यांना प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र लगेच द्यावे

हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे.

सातारा, कोल्हापूर, पुणे, औंध व बॉम्बे गॅझेटियरचे जीआर काढून अंमलबजावणी करावी.

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत; बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयांना नोकरी द्यावी.

मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सोयी-सवलती लागू करण्याच्या जीआरची अंमलबजावणी करावी

‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांचा प्रश्न, ‘सारथी’च्या योजना मार्गी लावाव्यात.

Samruddhi Mahamarg Robbery | समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत,नेमकं काय घडलं?

महामार्गावर रास्ता रोको

मराठा आंदोलकांनी शनिवारी शक्तिप्रदर्शन करून धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्री फाटा येथे रास्ता रोको केले. त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. आंदोलकांनी जोरदार घोषणाही दिल्या. अंतरवाली सराटीचे सरपंच आणि पोलिस, गावकरी यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

राज्य सरकार आणि सरकारी अधिकारी यांची मिलीभगत आहे. प्रत्येक विषयात राजकीय हस्तक्षेप आहे. महायुतीतील नेत्यांमध्ये सुरू असलेल्या श्रेयाच्या लढाईत मराठा समाजाचे नुकसान होत आहे. -मनोज जरांगे, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत