शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडली. मिशन टायगर हे शिंदेंनीच करावं, असं वक्तव्यदेखील त्यांनी यावेळी केलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बुलढाणा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. शिवसेनेच्या आमदारांना मित्रपक्ष असलेल्या भाजपकडून होणारा त्रास, मिशन टायगर आणि खासदार संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य यावर संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी संजय गायकवाड यांना 100 कोटींची नोटीस बजावली आहे. यावरही संजय गायकवाड यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विजयराज शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.
खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना पश्चात्ताप झाला असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुखांना भेटीसाठी त्यांच्या मातोश्री निवासस्थानी यावं, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर संजय गायकवाड यांनी भाष्य केलं. “हे वक्तव्य अडीच वर्षांपूर्वी केलं असतं तर गोष्टी इतक्या पुढे गेल्याच नसत्या. पण मला नाही वाटत की, आता कुणी परतीच्या मार्गावर आहे. जो निर्णय घेतील तो आमचे एकनाथ शिंदे घेतील”, अशी भूमिका संजय गायकवाड यांनी मांडली.
“ही सगळी खदखद महाराष्ट्रात आहेच, आम्हाला काही मित्रपक्षांकडून त्रास होता. यामुळे आमचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या नेत्यांना सांगणं आहे की, आपल्याला महाराष्ट्रातील युती भक्कम टिकवायची असेल तर अशी लोकं आवरली पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे अशा माणसाला देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकारी केलं कसं?”, असा सवाल संजय गायकवाड यांनी केला.
“ज्या लोकांच्या भरोशावर मूळ शिवसेवा बाहेर पडली आणि भाजपला महाराष्ट्रात पुन्हा सत्ता पाहायला मिळाली, त्या आमदारांसोबत भाजपने चांगलं वागावं, अशी भावना सर्व आमदारांची आहे. राजकारणात काय होऊ शकतं आणि काय नाही, एकनाथ शिंदे हे तर या गोष्टीमध्ये मास्टरर आहेत. मिशन टायगर हे फक्त एकनाथ शिंदे यांनीच करावं”, असंदेखील मोठं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं.
१०० कोटींचा दाव्यावर संजय गायकवाड काय म्हणाले?
“भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी १०० कोटींचा दावा ठोकलाय याचा अर्थ नक्कीच त्यांच्या गेल्या 35 ते 40 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत हजार ते दहा हजार कोटींची कमाई नक्कीच केली असणार. त्यामुळे ते शंभर कोटींचा दावा करत असतील, तर मलाही त्यांची ईडी किंवा सीआयडीकडे तक्रार करावी लागेल की, एवढे पैसे ह्यांनी कुठून आणले म्हणून”, असं संजय गायकवाड म्हणाले.
“मी त्यांची नोटीस वाचली. त्यामध्ये त्यांच्या वकिलांनी सांगितलं आहे की, मी त्यांच्या आशिलाला बदनामीकारक बोललो. अरे नगराध्यक्षाच्या निवडणुकीत माझ्या पत्नीने त्याचा 14,700 मतांनी पराभव केला. ज्याची इज्जत जनतेनेच ठेवली नाही तर त्याला मी बेईज्जत काय करणार आहे? जो विधानसभेच्या निवडणुकीत तीन वेळेस चार नंबरला गेला, पहिल्यावेळेला आम्ही त्यांना निवडून आणलं, दुसऱ्या आणि तिसऱ्यांदा काँग्रेसने निवडून दिलं, जो कधी स्वत:च्या बळावर जिंकला नाही, आणि नगरपालिकेत त्याचे तीन तेरा वाजले”, असा घणाघात संजय गायकवाड यांनी केला.
“मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक होतो, गुन्हे आमचे आभूषण होतं. आमच्यावरचे गुन्हे हे धर्मरक्षणाकरता झालेले आहेत. मुलींच्या रक्षणाकरता झालेले आहेत. गोरगरिबांच्या शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनाकरता आमच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. आजच्या तारखेला आमच्यावर एकही गुन्हा नाही. सर्व गुन्हे संपले आहेत. उच्च न्यायालयाने आम्हाला सगळ्या प्रकरणात निर्दोष केले आहेत. आज मी बुलढाण्यात केलेला विकास, एक आमदार काय करु शकतो हे दाखवून दिलं, त्यामुळे या लोकांचा जळफळाट झालेला आहे”, असं संजय गायकवाड म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा