Headlines

Jalgaon Dashrathnagar Brother Ends his Life by Posting Status on Mobile on Raksha Bandhan Day; सकाळी बहिणीने राखी बांधली, संध्याकाळी ‘हॅपी रक्षाबंधन ताई’ मोबाईलवर स्टेटस, भावाने स्वत:ला संपवलं; हॉस्पिटलमध्ये बहिणीचा हंबरडा


Jalgaon Crime News : सकाळी बहिणीने आनंदाने भावाला राखी बांधली. त्यानंतर भावाने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Jalgaon Crime News
रक्षाबंधनाला मोबाईलवर स्टेटस ठेवून भावाची आत्महत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
निलेश पाटील, जळगाव : सण उत्सवाचे दिवस म्हणजे आनंदाची पर्वणी, पण याच सणाच्या दिवशी एका दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. रक्षाबंधनानिमित्त सकाळीच बहिणीने मोठ्या प्रेमाने भावाच्या हातावर राखी बांधली, त्याच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना केली. भावानेही बहिणीचं औक्षण करून तिला नेहमी सोबत राहण्याचं वचन दिलं. मात्र, हा आनंद काही तासांपेक्षा जास्त टिकू शकला नाही. संध्याकाळच्या सुमारास याच भावाने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, बहीण भावाचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. सणाचा उत्साह आणि आनंदाचं वातावरण असतानाच जळगाव शहरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे. दशरथनगर परिसरात राहणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाने ‘हॅपी रक्षाबंधन ताई’, असं मोबाईलवर स्टेटस ठेवून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहित साहेबराव धनगर (वय18) असं मृत तरुणाचं नाव आहे. मोबाईल गेमच्या आहारी गेल्यानं आणि त्यातील आर्थिक व्यवहारामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Maharashtra TimesNepal Flood : डॉ. चितळेंसह ग्रुप नेपाळ महापुरावेळी रसुवागढीच्या इमिग्रेशन केंद्रावर, रिचा ट्रेक्सची माहिती, गंभीर फटका बसल्याची भीती

रुग्णालयात कुटुंबाचा आक्रोश

रोहित धनगरहा आई-वडील आणि लहान बहिणीसोबत दशरथ नगर (आसोदा रोड) येथे राहत होता. काल शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या दिवशी सकाळी रोहितने आपल्या लहान बहिणीकडून आनंदाने राखी बांधून घेतली. त्यानंतर आईला मामाच्या गावी जाण्यासाठी नवीन बस स्थानकावर सोडलं. काही वेळाने हा प्रकार निदर्शनास येताच नातेवाईकांनी व स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. सकाळीच बहिणीने ज्या हातावर राखी बांधली होती, त्याच हातावर राखी असलेल्या अवस्थेत रोहितचा मृतदेह पाहून रुग्णालयात कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांचं मन हेलावून टाकणारा होता. ऐन सणाच्या दिवशीच कुटुंबावर कोसळलेल्या दु:खाच्या डोंगरामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Maharashtra TimesShiv Sena vs BJP : शिवसेनेकडील खात्यांमध्ये CMO ची ढवळाढवळ, मंत्र्यांची शिंदेंकडे जाहीर नाराजी, रिक्षाचालकांच्या मराठीला मुदतवाढ मिळताच कडेलोट

धनगर कुटुंबावर दु:खाचा डोंगर

दुपारी तो वडिलांसोबत मेहरुण परिसरातील आत्याच्या घरी गेला होता. दुपारी 2 वाजेच्या सुमारास ‘माझं एक काम आहे, मी थोड्या वेळात येतो’, असं सांगून तो दशरथनगर येथील घरी परतला. घरी कुणीही नसताना रोहितने गळफास घेतला. ज्या हाताने सकाळी भावाला राखी बांधली होती, त्याच बहिणीला संध्याकाळी भावाचा निष्प्राण देह पाहावा लागल्यानं बहिणीचा हंबरडा उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. ‘माझ्या भावाला काय कमी होतं? त्याने असं का केलं?’, असा सवाल करत बहिणीने फोडलेला हंबरडा उपस्थितांना स्तब्ध करून गेला.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा