Headlines

‘तो चीटर आहे, इतर मुलींना आक्षेपार्ह फोटो पाठवत होता’, भव्या सिंहचे दिव्या अग्रवालच्या पतीबद्दल खळबळजनक दावे


मुंबई:रियालिटी शो ‘स्प्लिट्सव्हिला १२’ फेम भव्या सिंह हिनं अभिनेत्री दिव्या अग्रवाल आणि तिचा पती अपूर्व पाडगावकर यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत धक्कादायक दावे केले आहेत. त्यामुळे इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भव्यानं अपूर्वावर गंभीर आरोप करत त्याला ‘दगाबाज’ म्हटलं आहे. याच मुलाखतीत भव्या सिंहनं दावा केला की, अपूर्व पाडगावकर दिव्याशी प्रामाणिक राहिला नाहीए. तिनं असंही म्हटलं की दिव्यासोबत साखरपुडा झाला त्या दिवशीच अपूर्व इतर मुलींना स्वतःचे फोटो पाठवत होता.

इतकंच नव्हे तर भव्याच्या मते, जेव्हा तिनं दिव्याला याबद्दल सावध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दिव्यानं तिच्यावर विश्वास न ठेवता पतीची बाजू घेतली होती. पण आता दिव्या त्याच्याविरोधात पुरावे गोळा करत आहे .भव्यानं दिव्याच्या भूतकाळातील नातेसंबंधांचा उल्लेख करत अभिनेता एक्स बॉयफ्रेंड वरुण सूदचाही विषय काढला. वरुणनं आता खूश राहायला हवं, असंही ती म्हणाली.दिव्यानं भूतकाळात वरुण सूदला फसवलं होते, आता तिचे कर्मा तिच्यासमोर आले आहे, असंही भव्यानं म्हटलं.

वेगळे राहण्याबाबतचे दावे
दरम्यान, यापूर्वीही एका रियालिटी शोदरम्यान भव्या सिंहनं दावा केला होता की दिव्या आणि अपूर्व एकत्र राहत नाहीत.

Maharashtra TimesDisha Salian Case Update: 14 व्या मजल्यावरून पडली, फक्त दात तुटले? तपासात त्रुटी, दिशा सालियन प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांवर ताशेरे; निकाल राखून ठेवला
दिव्या अग्रवालचं स्पष्टीकरण
दिव्या अग्रवालनं काही काळापूर्वी वेगळे राहण्याबाबतच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं होतं. तिनं सांगितलं होतं की ती आणि तिचा पती दोघेही स्वतःच्या पर्सनल स्पेसला महत्त्व देतात. परस्पर सहमतीनं दोघांनी वेगवेगळ्या जागेत राहण्याचा निर्णय घेतला असून यात कोणताही वाद नाही, असं दिव्याने स्पष्ट केलं होतं.

दिव्या अग्रवाल आणि अपूर्व पाडगावकर यांचा विवाह फेब्रुवारी २०२४ मध्ये पार पडला होता. भव्या सिंहच्या या नवीन आणि गंभीर आरोपांवर अद्याप दिव्या अग्रवाल किंवा अपूर्व पडगावकर यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीए.

Maharashtra TimesK Annamalai on Toxic: ‘एकाच वेळी ‘पत्नी आणि प्रेयसी’, ‘विद्यार्थ्यांची एक पिढी उद्ध्वस्त होतेय’, के. अन्नामलाई यांची नाव न घेता ‘टॉक्सिक’वर जोरदार टीका

‘गोल्ड डिगर’ असल्याचे दिव्यावर आरोप
रियालिटी शो दरम्यान आणि सोशल मीडियावर नेटिझन्सकडून दिव्यावर ‘गोल्ड डिगर’ (पैशासाठी लग्न करणारी) असल्याचे आरोप केले गेले होते. या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देताना दिव्या म्हणाली, “मला लोक काय म्हणतात त्यानं फरक पडत नाही. मला स्वतःला ‘डायमंड डिगर’ म्हणवून घ्यायला आवडेल, कारण माझा नवरा अपूर्व हा माझ्यासाठी हिऱ्यासारखा अमूल्य आहे. मी पैशाच्या मागे धावणारी व्यक्ती नाही.”

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत