Headlines

महिला आशिया कपला आजपासून सुरूवात, भारत वि. पाकिस्तान सामना केव्हा? संपूर्ण शेड्यूल जाणून घ्या


Women Asia Cup Schedule 2026 News : महिला आशिया कप स्पर्धेला आजपासून सुरूवात झाली आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्याची सर्वांना आतुरता असणार आहे. भारत-पाक सामना कधी होणार जाणून घ्या.

Women Asia Cup Schedule 2026
Women Asia Cup Schedule 2026(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : यंदाच्या आशिया कप महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणाऱ्या या स्पर्धेची अंतिम फेरी १३ सप्टेंबरला होईल. भारत, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यासह यजमान संयुक्त अरब अमिराती, थायलंड, इंडोनेशिया आणि हाँगकाँग हे संघही पात्रता फेरीचा (महिला प्रीमियर कप) अडथळा दूर करून स्पर्धेत सहभागी होत आहेत.

काही आठवड्यांतच जपानमध्ये रंगणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांची पूर्वतयारी सहभागी संघांना आशिया कपमधून करता येईल. मात्र, सध्या तरी गतविजेत्या श्रीलंकेपेक्षाही ‘भारतालाच जेतेपदासाठी ‘फेव्हरिट’ समजले जात आहे. ‘अंतिम सामन्यात भारताविरुद्ध कोणता संघ खेळणार?’ असा प्रश्न चर्चासत्रांमध्ये उपस्थित होत आहे.भारत-पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी असले, तरी त्यांच्यातील लढती एकतर्फी होत आहेत. त्यामुळेच या स्पर्धेतही सामन्याच्या निकालापेक्षा प्रतिस्पर्ध्यांच्या हस्तांदोलनावर जास्त लक्ष दिले जाते. आजचा पहिला सामना हाँगकाँ वि. थायलँडमध्ये असून संध्याकाळी ८ वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे.

Maharashtra TimesDevdutt Padikkal Jersey : बाप रे, हे काय! देवदत्त पडिक्कलच्या अंगावर उमटला पाठीवरच्या जर्सीचा टॅटू; फोटो तुफान व्हायरल

भारताची बाजू

वर्ल्ड कप महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा गटात गारद होण्याची नामुष्की भारतावर आली. कालानुरूप भारतीय टी-२० संघात नेतृत्वबदल आवश्यक आहे, असे तज्ज्ञ तसेच माजी क्रिकेटपटूंचे मत आहे. आशिया कपसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातील बहुतेक खेळाडूंना इंग्लंड दौऱ्यावरील टी-२० मालिकेचा अनुभव आहे. जायबंदी जेमिमाह रॉड्रिग्जच्या जागी संघात प्रतीका रावल हिला संधी देण्यात आली; पण हा निर्णय गोंधत्ळात टाकणारा आहे. प्रतीकाची शैली टी-२०ला साजेशी नसून, २०२४नंतर ती आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळलेली नाही. अनेक गुणी क्रिकेटपटू प्रतीक्षेत असताना प्रतीकाला संधी देणे निश्चितच भुवया उंचावणारे ठरते.

Maharashtra TimesIND vs SL Test : भारत कुठे कमी पडला? श्रीलंकेच्या एकाच खेळाडूने 420 मिनिटांत 264 बॉल खेळले अन् गेम फिरला WTC पॉइंट टेबलमध्ये झटका
निकी प्रसाद, अनुष्का शर्मा आणि वृंदा दिनेश यांनी देशांतर्गत स्पर्धा तसेच ‘अ’ संघाच्या मालिकांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. संघ निवडीसंदर्भात वादग्रस्त मुद्दे असले, तरी भारतीय संघाला संभाव्य विजेता म्हणून संबोधले जात आहे.

Maharashtra TimesSonal Dinusha IND vs SL : टीम इंडियाला विजयापासून रोखलं, पण सामन्यानंतरच्या वक्तव्याने भारतीयांचं मन जिंकलं! दिनुशा नेमकं काय म्हणाला?

भारताचे होणारे सामने

  • ३० ऑगस्ट — भारत वि. थायलंड
  • ३ सप्टेंबर — भारत वि. हाँगकाँग
  • ५ सप्टेंबर — भारत वि. पाकिस्तान

महत्त्वाचे…

  • आयसीसीच्या सहसदस्य संघांपैकी फक्त थायलंड थोडीफार प्रगती करत असून, अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे.
  • पाच वेळा स्पर्धेत भाग घेणाऱ्या थायलंडची खुबी म्हणजे धाडसी खेळ.
  • श्रीलंका (२०१८) आणि पाकिस्तान (२०२२) अशा मुरलेल्या संघांविरुद्ध विजय मिळवत थायलंडने चुणूकही दाखवली आहे.
  • दोन आशिया कपचा अनुभव असणाऱ्या अमिराती संघाने स्पर्धेत फक्त एक विजय मिळवला आहे. (२०२२मध्ये मलेशियाविरुद्ध)
  • हाँगकाँग संघ १४ वर्षांनंतर आशिया कपमध्ये पुनरागमन करत असून, यंदाच्या स्पर्धेद्वारे इंडोनेशिया संघ पदार्पण करत आहे.
हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा