Headlines

तपासात त्रुटी, मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांवर ताशेरे; निकाल राखून ठेवला


मुंबई:दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणावरून मुंबई उच्च पोलिसांच्या तपास पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. एखादी व्यक्ती १४ व्या मजल्यावरून खाली पडल्यास तिच्या शरीरावर इतर गंभीर जखमा न होता फक्त दात, तोंड किंवा चेहऱ्यालाच इजा कशी होऊ शकते, असा थेट सवाल न्यायालयानं विचारला आहे.

दिशाचे वडील सतीश सालियान यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. दिशावर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला असून या प्रकरणी एफआयआर नोंदवून सीबीआय तपासाची मागणी केली आहे.

न्यायालयाचे महत्त्वाचे प्रश्न आणि आक्षेप

१४ व्या मजल्यावरून खाली पडलेल्या व्यक्तीच्या अंगावर मोठ्या प्रमाणावर गंभीर मारहाण किंवा हाडे तुटल्याच्या खुणा असायला हव्यात. पण वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीवरून शरीरावर अपेक्षित गंभीर जखमा नसल्याचं निदर्शनास आल्यानं कोर्टाने पोलिसांच्या तिनं आयुष्य संपवल्याचा जो दावा केलाय, त्या दाव्यावर शंका व्यक्त केली.

एफआयआर का नोंदवला नाही?

वडिलांनी हत्येचा आणि अत्याचाराचा संशय व्यक्त केलेला असतानाही पोलिसांनी या प्रकरणाची केवळ ‘अपघाती मृत्यू’ म्हणून नोंद का केली, आणि गुन्हा का दाखल केला नाही, असा सवाल कोर्टानं केला.

Maharashtra TimesOrry Slams Amrita Singh: ‘प्रचंड मानसिक त्रास, नरकयातना दिल्या, वाईट लोकांसोबत वाईटच घडतं’, ऑरीचा अमृता सिंगवर निशाणा, इंडस्ट्रीत खळबळ
माहिती देण्यास टाळाटाळ

पोलिसांकडं केवळ अपघाती मृत्यूची चौकशी सुरू होती, तर मग पीडित कुटुंबीयांना केसशी संबंधित आवश्यक कागदपत्रे देण्यास का टाळाटाळ करण्यात आली, यावरही हायकोर्टानं पोलिसांना धारेवर धरलंय.

Maharashtra TimesMadhu Chandra on Kriti Sanon ad: ‘माझी लेक पण घालते असे कपडे, पण कुठे काय घालावं याला मर्यादा हव्या’, मधु चोप्रा यांचा क्रिती सेननला टोला
वकिलांचा गंभीर आरोप

दिशाच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांनी न्यायालयात सांगितलं की, घटनास्थळाचे तसंच अंत्यसंस्काराच्या वेळचे फोटो पाहता तिच्या शरीरावर १४ व्या मजल्यावरून पडल्यासारख्या गंभीर जखमा दिसत नव्हत्या. पोलिसांनी नंतर तयार केलेले पुरावे आणि डोक्याला दुखापत झाल्याचे दाखवणारे फोटो बनावट असल्याचा आरोपही वकिलांनी केला.

दरम्यान, राज्य सरकारच्या वकिलांनी सांगण्याचा प्रयत्न केला की, साक्षीदारांचे जवाब आणि एसआयटीच्या तपासात ही दिशानं आयुष्य संपवल्याचं समोर आलं आहे. मात्र न्यायालयानं, एका वडिलांनी आपली मुलगी गमावली आहे आणि या प्रकरणात कायद्यानुसार पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, असं स्पष्ट करत पोलिसांना आणि संबंधित पक्षांना आपली उत्तरं सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत