Headlines

Relatives harassment of widow police file a case; पतीचं निधन झालं, सांत्वनाच्या बहाण्याने नातेवाईकाची जवळीक, पण नंतर तरुणीसोबत भयंकर प्रकार


सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: पतीच्या निधनानंतर सांत्वनाच्या बहाण्याने जवळीक साधून एका २६ वर्षीय विधवेचा नात्यातील व्यक्तीने शारीरिक व मानसिक छळ केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून ब्लॅकमेल करून नंतर जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसंच महिलेचे बनावट सोशल मीडिया अकाऊंट बनवून अश्लील फोटो नातेवाईकांना पाठवून ते व्हायरल केल्याप्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर रामनाथ काकडे ( वय ४५, रा. नाथनगर वडखा, शेंद्रा एमआयडीसी ) असे नात्यातील आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,२६ वर्षीय पीडित महिलेच्या पतीचे नोव्हेंबर २०२५ मध्ये निधन झाले होते. त्यानंतर सासरच्यांशी प्रॉपर्टीवरून वाद झाल्याने पीडिता हर्सूल परिसरात भाड्याच्या खोलीत राहू लागली. या काळात तिचा नात्यातील मात्र दूरचा भावजी ज्ञानेश्वर रामनाथ काकडे याने सांत्वन करण्याच्या बहाण्याने तिच्याशी जवळीक साधली. स्वतःची पत्नीही हयात नसल्याचे सांगून त्याने आपण दोघे लग्न करू असे सांगत पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले.

दरम्यान जून २०२६ मध्ये पीडित महिलेने खाजगी कंपनीत नोकरी सुरू केल्यानंतर आरोपीने तिच्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. ती कुणाशी बोललेली त्याला चालत नसे, त्यावरून तो तिचा पाठलाग करून तिला शिवीगाळ व मारहाण करू लागला. १२ जून २०२६ रोजी मध्यरात्री १ वाजता आरोपीने पीडितेच्या हर्सूल येथील घरी जाऊन तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला असता, माझ्याशी बोलली नाहीस तर तुझे आणि माझे फोटो व्हायरल करेन, अशी थेट धमकी दिली.

बनावट इन्स्टाग्राम आयडीवरून नातेवाईकांना पाठवले अश्लील फोटो

आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडिता हनुमाननगर परिसरात राहण्यास गेली आणि तिने स्वतःचा मोबाईल नंबरही बंद केला. याचा राग येऊन आरोपी ज्ञानेश्वर काकडे याने २५ ऑगस्ट २०२६ पासून इन्स्टाग्रामवर ‘hamster.1459334’ आणि ‘sairaj kakade’ या नावाने बनावट आयडी तयार केले. त्यावरून पीडितेच्या नातेवाईकांना रिक्वेस्ट पाठवून अश्लील फोटो व मेसेज पाठवले, तसेच ते फोटो स्टोरीला ठेवून व्हायरल केले. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पुंडलिक नगर पोलिसांनी कलम ७४, ७५, ७८, ११५(२), ३५२ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक मुंढे पुढील तपास करत आहेत.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत