Headlines

Dhule Sakri Young Married Woman and Gram Panchayat Peon Killed by Bhondubaba Yogesh Khairnar on Shani Amavasya; फायनान्समध्ये काम करणाऱ्या तरुणीला अन् ग्रा.पं शिपायाला एकाच रात्री संपवलं, भोंदूबाबाचा मोठा कांड; शनी अमावस्येच्या रात्रीची घटना


Dhule Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच धुळे जिल्हा एका दुहेरी हत्याकांडानं हादरला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Sakri Bhondubaba Yogesh Khairnar murder woman
धुळे मराठी बातम्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अजय गर्दे, धुळे : धुळ्यातील साक्री तालुक्यामधील निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीत भडगाव रस्त्यावरील टेंभे फाट्याजवळ एका तरुणीची बॉडी आढळून आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून बॉडी ताब्यात घेतली. प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुणीची ओळख जयश्री रजनीकांत काकुस्ते (वय 25, रा. कासारे, ता. साक्री) अशी असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित तरुणी बजाज फायनान्सच्या साक्री कार्यालयात काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात एका संशयित भोंदूबाबाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या भोंदूबाबानेच हा हत्याकांड केलं असल्याचं सांगण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही घटना काल शनी अमावस्येच्या रात्री घडली असल्याचं समोर आलं आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री या विवाहित असून त्यांना एक अपत्य आहे. त्या कामानिमित्त छडवेल येथे गेल्या होत्या. रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास त्यांनी पतीला फोन करून ‘घरी येत आहे’, असं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी पतीला साक्री येथे घेण्यासाठी बोलावलं. मात्र, पती साक्री येथे पोहोचल्यानंतर त्यांचा मोबाईल बंद लागत होता. दरम्यान, आज सकाळी ग्रामस्थांनी एका तरुणीची बॉडी आढळल्याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस व फॉरेन्सिक पथक दाखल झालं असून तपास सुरू आहे.
Maharashtra TimesNashik Crime : AGM कडून खतपाणी; धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण, कोर्ट काय म्हणालं?
विशेष म्हणजे घटनास्थळी गाडीला कोणतीही धडक किंवा खरचटल्याच्या खुणा आढळून आल्या नाहीत. तसेच मृत विवाहितेचे पैसे मिळून आले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. घटनेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच उभरांडी शिवारात देखील एका तरूणाची बॉडी आढळून आली असून तोही या घटनेशीच संबंधीत असल्यानं ही दुहेरी हत्याकांडाची घटना असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Maharashtra TimesNashik News : कांदाप्रश्नी उत्पादक शेतकरी आक्रमक, प्रतिक्विंटल 3 हजार रुपयांच्या हमीभावाची साद; नुकसान भरपाईचीही मागणी

भोंदूबाबाला घेतलंय ताब्यात

मयत तरूणाची देखील ओळख पटली असून त्याचं नाव अक्षय गंगाधर सोनवणे (रा. भाडणे ता. साक्री) असून तो स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये शिपाई पदावर कार्यरत होता. स्थानिक गुन्हे शाखेनं देखील घटनास्थळाची पाहणी करीत तपास सुरू केला आहे. संशयित मृत्यूंचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील रस्त्यांवर आणि प्रतिष्ठानांवर बसवण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचं काम सुरू केलं आहे. जयश्री तेथे कशी पोहोचली? आणि तिच्यासोबत नेमकं काय घडलं? याचा माग काढण्यासाठी पोलीस विविध पथके तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी एका संशयित आरोपीस ताब्यात घेतलं असून त्याचं नाव योगेश खैरनार उर्फ भैय्या महाराज (रा. जैताणे) असं असून तो गोसंवर्धन आणि भोंदुगिरीचं काम करत असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा