Kanda Express: शेतकरी संघटनांचा आरोप, आहे की एनसीसीएफने शेतकऱ्यांकडून कांदा १२०० ते १४०० रुपये क्विंटल दराने खरेदी करून महानगरांत ३० रुपये किलो दराने विक्रीची तयारी केली असून यातून नफा कमावला जात आहे.

मंगळवारी सायंकाळी सुरू झालेले लोडिंग संथ गतीने सुरू राहिले. प्रतवारी व पॅकिंग वेळेत न झाल्याने कांदा एक्स्प्रेस निर्धारित वेळेपेक्षा सुमारे ३२ तास उशिराने, बुधवारी दुपारी ३.१० वाजता दिल्लीकडे रवाना झाली. या विलंबामुळे प्रतिबोगी प्रतितास १५० रुपये दंडाप्रमाणे सुमारे एक लाख रुपयांचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे.
Nashik News: पासष्ट लाखांचा आठ वर्षांत अपहार; नाशिक महापालिकेच्या घरपट्टी वसुलीत सावळा गोंधळदरम्यान, प्रहार संघटनेचे अध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी ही रेल्वे अडवली. लोड केलेला कांदा नाशिक जिल्ह्यातील नसून सडलेला असल्याचा आरोप त्यांनी केला. हा कांदा कोणत्या शेतकऱ्यांकडून व कोणत्या एजन्सीमार्फत खरेदी केला, याची माहिती देण्याची मागणी त्यांनी केली. निंबाळकर रेल्वे रुळांवर उतरल्याने रेल्वे पोलिस व लासलगाव पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सुमारे दीड तासाच्या गोंधळानंतर कांदा एक्स्प्रेस रवाना झाली.
“आमच्या शेतकऱ्यांचा कांदा शिल्लक असताना एनसीसीएफ सडलेला कांदा दिल्लीला पाठवत आहे. याचा परिणाम बाजारभावावर होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते,” असा आरोप निंबाळकर यांनी केला.
Nashik Crime : गर्लफ्रेण्ड रुसली, 27 वर्षांच्या आदित्यने थेट चौकातच ‘सॉरी’चा बॅनर लावला, लोकांमध्ये चर्चा, पोलिसांकडून ‘पंचनामा’विलंबामागची तीन कारणे
लोडिंग संथ गतीने : मंगळवारी सायंकाळी सुरू झालेले कांदा लोडिंग रात्रीपर्यंत सुरू राहिले; गती कमी असल्याने ट्रेन वेळेत भरली नाही
प्रतवारी व पॅकिंगला विलंब : कांद्याची प्रतवारी आणि पॅकिंग पूर्ण न झाल्याने ८४० टन ऑर्डर असूनही केवळ सुमारे ५०० टन कांदा लोड होऊ शकला
आंदोलनामुळे अडथळा : प्रहार संघटनेने कांद्याचा दर्जा व खरेदीतील पारदर्शकतेवर आक्षेप घेत ट्रेन अडवली. त्यामुळे रवाना होण्यास आणखी विलंब

