Headlines

Filming of ‘Scam 2010’ begins.


हंसल मेहता करणार दिग्दर्शन

भारतातील सर्वात पसंतीची वेबसीरिज फ्रेंचाइजी ‘स्कॅम 1992’चा पुढील अध्याय आता अधिकृतपणे सुरु झाला आहे. सोनी लिव, बिर्ला स्टुडिओज आणि अप्लॉज एंटरटेनमेंटने ‘स्कॅम 2010’चे चित्रिकरण सुरू केले आहे. ‘स्कॅम 2010’ एका असा व्यक्तीचा प्रवास दाखविणार आहे, ज्याने छोट्या छोट्या बचत योजनांपासून सुरूवात केली आणि हळूहळु एक अत्यंत मोठे उद्योग साम्राज्य उभे केले.

सीरिजमध्ये त्याचा संघर्ष, महत्त्वाकांक्षा, वाढता प्रभाव आणि मग लोकांच्या नजरेत आल्यावर निर्माण झालेले वाद दाखविण्यात येतील. विश्वासाच्या बळावर कशाप्रकारे एक मोठे साम्राज्य उभे झाले आणि मग तोच विश्वास संपुष्टात आल्यावर सर्वकाही बदलले यावर कहाणी बेतलेली असणार आहे.

स्कॅम 2010 चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता करत आहेत. या सीरिजमध्ये सिद्धार्थ बोडके मुख्य भूमिकेत आहे. या भूमिकेची जटिलता आणि शोची मोठी व्याप्ती अत्यंत पसंत पडल्याचे सिद्धार्थ यांनी सांगितले आहे. या सीरिजचे चित्रिकरण सध्या सुरू असून ती सोनी लिववर स्ट्रीम होणार आहे.

 



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत