Headlines

Onion Express Nashik मध्ये सडका कांदा?, Ravikant Tupkar यांचं उद्या कर्जमाफीवरून आंदोलन – onion express nashik rotten onion ravikant tupkar farmer loan waiver protest


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राज्यातील शेतकऱ्यांसाठी या व्हिडिओच्या निमित्तानं दोन बातम्या खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली बातमी अशी आहे, राज्यात शेतकरी कर्जमाफी संथ गतीनं सुरू असताना दुसरीकडे मात्र नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र तुर्तास कोणताही दिलासा देण्यात आलेला नाहीय. त्यामुळं प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असणारे शेतकरी खूप संतापलेले आहेत. यावरूनच आता ‘क्रांतिकारी’ शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी गणिमी काव्यानं थेट राज्याच्या मंत्रालयासमोरील शासकीय बंगल्यांवर जाहीर लिलाव आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी आहे की, किरकोळ बाजारात आणि विशेषता दिल्लीत आणि इतर मोठ्या शहरांमध्ये कांद्याचे भाव वाढले म्हणून नाशिकच्या लासलगावमधून २१ बोग्यांमध्ये कांदा भरून रवाना झालेली ‘कांदा एक्सप्रेस’. देशभरात कांद्याचे दर झपाट्याने वाढत असल्याचं केंद्र सरकारने कारण दिलं आणि सामान्य ग्राहकांसाठी तातडीनं लालसगावमधील कांद्याचा बफर स्टॉक उचलत या रेल्वेनं नेला आहे. मात्र यामुळं आता नाशिक आणि लासलगावसह इतर आजूबाजूच्या बाजारपेठेत शेतकऱ्यांना जो चांगला दर मिळत होता. तो हा कांदा बाजारात आल्यानं कोसळण्याची भीती आहे. यावरूनच प्रहार संघटनेचे नेते गणेश निंबाळकर यांनी आज दिल्लीला होणाऱ्या रेल्वेला विरोध करत ट्रेनसमोर आडवे झाले होते. तेव्हा कर्जदारांच्या मागण्यांवरून रविकांत तुपकर आंदोलनासाठी कोणता गणिमी कावा करणार, मंत्रालयासमोरील आंदोलनात किती शेतकरी जमाणार यासोबतच सरकारनं लासलगावमधील कांदा कुठे नेला, त्यामागे कोणतं कारण आहे, आणि सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळं खरंच शेतकऱ्यांचं नुकसान होणार का, त्यामागे कोणता दावा केला जातोय हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत.#MaharashtraFarmers #MaharashtraFarmerNews #FarmerLoanWaiver #MaharashtraKarjmafi #ShetkariKarjmafi #FarmerLoanWaiver2026 #RavikantTupkar #RavikantTupkarProtest #RavikantTupkarAndolan #FarmerProtest #ShetkariAndolan #MaharashtraGovernment #MantralayaProtest #IncentiveGrant #ShetkariAnudan #RegularLoanPayingFarmers #OnionExpress #OnionExpressNashik #LasalgaonOnion #LasalgaonOnionMarket #NashikOnion #NashikOnionPrice #OnionPriceHike #OnionPrice #OnionBufferStock #GovernmentOnionStock #OnionRailway #DelhiOnion #OnionFarmers #OnionFarmerNews #GaneshNimbalkar #PraharSanghatana #NashikFarmers #LasalgaonFarmers #MaharashtraAgriculture #FarmerIssues #ShetkariNews #MaharashtraNews #MarathiNewsTwo major developments are important for Maharashtra’s farmers. First, as the farm loan waiver process moves slowly, farmers eligible for incentive grants are angry over the lack of relief. Farmer leader Ravikant Tupkar has warned of a unique protest outside government bungalows near Mantralaya. Second, an Onion Express carrying onions from Lasalgaon to Delhi has been sent to control rising prices in major cities. But farmers fear that the arrival of this buffer-stock onion could push down prices in Nashik and nearby markets. Ganesh Nimbalkar has also protested against the train. So, what is Ravikant Tupkar’s protest strategy, why did the government send onions from Lasalgaon, and will this decision actually hurt farmers? We explain it all in this video.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत