Headlines

वैभव आणि जयस्वालला आताच आवरा, संजय मांजरेकरांची जाहीरपणे दोघांवर कारवाई करण्याची मागणी, काय कारण?


Sanjay Manjrekar On Vaibhav & Jaiswal : भारताचे माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी आयसीसीकडे वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नेमकं काय कारण? जाणून घ्या.

Sanjay Manjrekar Jay Shah
Sanjay Manjrekar Jay Shah(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून दुसरा कसोटी सामना सुरू आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवत १-०ने आघाडी घेतलीय. तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये दुलीप ट्रॉफी स्पर्धा सुरू आहे. यादरम्यान भारताचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी भारताचा उगवता तारा असलेल्या वैभव सूर्यवंशी आणि सलामीवीर यशस्वी जयस्वाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संजय मांजरेकर यांनी एक्स पोस्ट करताना आयसीसी आणि बीसीसीआयला टॅग केले आहे. पण मांजरेकर यांंनी कारवाई करण्याची मागणी का केली? जाणून घ्या.

आयसीसी आणि बीसीसीआय वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांच्या वर्तनाकडे तुम्ही वारंवार दुर्लक्ष करून त्यांना मोकळं सोडलंत, तर त्यांच्या मनात हे वर्तन योग्य असल्याची भावना निर्माण होईल आणि ते पुन्हा असंच वागतील. हे क्रिकेटसाठी चांगलं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या स्वतःच्या भविष्यासाठीही चांगलं नाही, असं संजय मांजरेकर म्हणाले आहेत. संजय यांच्या एक्स पोस्टची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.

Maharashtra TimesImran Khan : ‘इम्रान खान यांना एका डोळ्याने कमी दिसतं, खिडकी नसलेली कोठडी’; मुलाचे खळबळजनक दावे, काय म्हणाला?
श्रीलंकेमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेसाठी वैभव सूर्यवंशी याची भारत अ संघात निवड झाली होती निवड झाली होती. तेव्हा एक सामना वादग्रस्त ठरला होता. सुपर ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यात वैभव हा धावा करण्यात अपयशी ठरला होता. ज्यावेळी तो आऊट झाला तेव्हा माघारी जात असताना श्रीलंकेचा खेळाडू त्याला काहीतरी बोलला, तेव्ह वैभव त्याला जाऊन थेट भिडला होता. मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. तर आता यशस्वी जयस्वालचे दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो याच्यासोबत वाद झाला. तेव्हा यशस्वीला आऊट केल्यावर माघारी जात असताना त्याला भिडलेला. दोघेही एकमेकांवर धावून गेले होते. श्रीलंका संघाच्या खेळाडूंनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला होता.

Maharashtra TimesDivya Mahajan : अभिमानास्पद! नाशिकच्या 16 वर्षाच्या दिव्याने नॉर्थ चॅनेलची ४० किमी खाडी पार करत रचला इतिहास, किती वेळ लागला?आयसीसीने यशस्वी जयस्वाल आणि असिथा फर्नांडो यांच्यावर कारवाई केली होती. दोघांची २५ टक्के मॅच फी आणि १ डिमेरिट पॉइंट देण्यात आला होता. याचाच धागा पकडत संज मांजरेकरांनी आयसीसी आणि बीसीसीआयला कारवाई करण्याची मागणी केलीय. यशस्वी जयस्वाल ज्या प्रकारे वागला होता त्यावरून अनेक माजी खेळाडूंनी त्याच्यावर टीका केली होती. समालोचक हर्षा भोगले यांनी केलेल्या टीकेला तर यशस्वीने आपल्या इन्स्टा अकांऊटवरून रिप्लाय केला होता. आता आयसीसी आणि बीसीसीआय यावरून काही निर्णय घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.