Headlines

Nashik Man puts Sorry on Banner at Dindori Road to console Girlfriend Crime News; गर्लफ्रेण्ड रुसली, 27 वर्षांच्या आदित्यने थेट चौकातच ‘सॉरी’चा बॅनर लावला, लोकांमध्ये चर्चा, पोलिसांकडून ‘पंचनामा’


Nashik Man Sorry Banner for Girlfriend : गुलाबी-लाल रंगातील मोठे ‘बदाम’ आणि त्यावर इंग्रजीत मोठ्या अक्षरांत लिहिलेले ‘सॉरी’ असा बॅनर पाहून नाशिककरांमध्ये एकच चर्चा रंगली.

Nashik Boy Sorry Banner for Girlfriend Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : प्रेम व्यक्त करण्याचे आणि प्रेयसीचा रुसवा घालवण्याचे प्रत्येकाचे फंडे वेगळे असतात. कुणी गुलाबाचे फूल देतो, तर कुणी खास सरप्राइज ‘प्लॅन’ करतो. मात्र, नाशिकमधील एका तरुणाने प्रेयसीची माफी मागण्यासाठी असा काही धाडसी मार्ग निवडला की, प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. एका कॉलेजसमोर लावलेला ‘सॉरी’चा बॅनर चांगलाच चर्चेत आला असून, पोलिसांनी प्रियकरासह बॅनर छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेस मालकावर कारवाई केली आहे.

सॉरीच्या बॅनरची गावभर चर्चा

दिंडोरी रोडवरील एका कॉलेजसमोरील झाडावर चार दिवसांपूर्वी सकाळी अचानक भलामोठा बॅनर झळकला. गुलाबी-लाल रंगातील मोठे ‘बदाम’ आणि त्यावर इंग्रजीत मोठ्या अक्षरांत लिहिलेले ‘सॉरी’. हा बॅनर पाहून परिसरात एकच चर्चा रंगली. प्रेयसीचा राग खरोखर गेला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी संशयित ‘रोमिओ’ आदित्य गणेश शेलार याच्यासह विनापरवानगी बॅनर छापून देणाऱ्या प्रिंटिंग प्रेस चालक रूपेश सुदाम लोहार यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. दोघांविरुद्ध ‘महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा, १९९५’च्या कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Maharashtra TimesCrime News : गोदावरीत उडी, इंजिनिअर आजोबा-आजी-आईच्या आयुष्याची अखेर, नातू बचावला; शाळेतील रायफल शूटिंग कोचला अटक

बॅनर उतरवून गुन्हा दाखल

‘भावाने नेमके काय केले असेल?’ आणि ‘तिने माफ केले की नाही?’ अशा चर्चा परिसरात रंगू लागल्या. लोकांसाठी हा विषय मनोरंजनाचा ठरला असला, तरी कायद्याच्या दृष्टीने ही बाब गंभीर ठरली. म्हसरूळ पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार दीपक अरगडे गस्तीवर असताना त्यांना या बॅनरची माहिती मिळाली. पाहणी केली असता, बॅनर लावण्यासाठी ना नाशिक पोलिसांची परवानगी घेण्यात आली होती, ना महापालिकेची. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण झाल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी दोन पंचांना बोलावून पंचनामा केला आणि संबंधित बॅनर खाली उतरवला.

Maharashtra TimesMumbai News : लोखंडी सळई उडून डोक्यावर आदळली, विद्याविहारमध्ये विद्यार्थी जखमी, डोक्याला टाके, महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप

प्रेयसीचा रुसवा घालवण्यासाठी उपद्व्याप

‘बॅनर कोणी लावला?’ याचा शोध घेण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले. त्यानुसार उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख आणि संदीप मिटके यांनी पथकांना तांत्रिक विश्लेषणासह गोपनीय तपास करण्याच्या सूचना दिल्या. तपासादरम्यान पोलिस ‘श्री आर्ट डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग’चे मालक संशयित रूपेश लोहार यांच्यापर्यंत पोहोचले. चौकशीत रविवार पेठेत राहणाऱ्या २७ वर्षीय संशयित आदित्य शेलार याचे नाव पुढे आले. प्रेयसीचा रुसवा घालवण्यासाठी आदित्यने हा बॅनर छापून घेत रात्री कॉलेजसमोरील झाडावर लावल्याचे तपासात समोर आले.