देशात सण-उत्सवांचा हंगाम सुरू झाला आहे. 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद आहे. तर 28 तारखेला रक्षाबंधन आहे. हे दोन्ही दिवस हॉलिडे आहेत. परंतु, यांचा शेअर बाजारावर कितपट परिणाम असेल? या दिवशी शेअर बाजार बंद असतील की खुले असतील? असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांना पडले आहेत. 26 तारखेपासून ते वर्षाच्या शेवटापर्यंत शेअर बाजार बंद असणाऱ्या सर्व तारखा जाणून घ्या.

26 ऑगस्ट उद्यावर आहे. देशभरात ईद-ए-मिलादची सुट्टी असते. अशात शेअर बाजारात काय सुरू असेल? आणि काय बंद? असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडला आहे. ईद-ए-मिलाद सणामुळे शेअर बाजार पूर्णपणे बंद राहणार नाही. गुंतवणूकदारांना नेहमी प्रमाणे खरेदी-विक्री करता येणार आहे. पण या दिवशी सेटलमेन्ट होणार नाही. एकंदरीत, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 26 ऑगस्ट रोजी एखादे शेअर्स खरेदी केले तर ते Demat खात्यात मिळवण्यासाठी गुंतवणूकदाराला एक दिवस थांबावे लागेल. म्हणजे गुंतवणूकदाराने 26 ऑगस्ट रोजी खरेदी केलेले शेअर्स 27 तारखेला Demat खात्यात येतील.
आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर एखादा शेअर्स 26 तारखेला विकला तर तर ती रक्कम मिळवण्यासाठी गुंतवणूकदाराला 27 ऑगस्टची वाट पहावी लागेल. फक्त 26 ऑगस्ट नव्हे तर 25 ऑगस्ट रोजी खरेदी तसेच विक्री केलेल्या शेअर्स 27 ऑगस्ट रोजीच सेटल होईल. एकंदरीत, 26 ऑगस्टरोजी एनएसई तसेच बीएसई खुली आहे. या दिवशी शेअर्स खरेदी-विक्री करता येईल परंतु सेटलमेन्ट होली डे असल्यामुळे खरेदी केलेले शेअर्स प्राप्त किंवा विक्री केलेले शेअर्सची रक्कम मिळवण्यासाठी एका दिवसाची वाट पहावी लागेल. या दिवशी करन्सी मार्केट पूर्णपणे बंद असेल. तर MCX पूर्णपणे खुले राहील.
28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळे शेअर बाजरासंबंधित अनेक प्रश्न गुंतवणूकदारांना आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी शेअर बाजारावर काही विशेष परिणाम होणार नाही. सर्व कामकाज अगदी सुरळीत सुरू राहील.
8th Pay Commission Salary Hike: 2.57 पेक्षा कमी फिटमेंट फॅक्टर तरी सॅलरीत मोठी वाढ शक्य; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचे नवीन Calculationयेत्या काही दिवसांमधील शेअर बाजारतल्या सुट्ट्या
14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्यामुळे शेअर बाजार पूर्णपणे बंद राहील. त्याच प्रमाणे, 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती असल्यामुळे शेअर बाजार पूर्णपणे बंद राहील. तसेच दसऱ्याच्या दिवशी शेअर बाजार बंद राहणार असून 10 नोव्हेंबर रोजी दिवाळी-बलिप्रतिपदा असल्यामुळे ट्रेडिंग बंद राहील. गुरु नानक जयंती तसेच नाताळाच्या दिवशी शेअर बाजार बंद राहील.

