Kuku Kohli Passes Away : अरुणा इराणी यांचे पती आणि दिग्दर्शक कुकू कोहली यांचं वयाच्या ७७व्या वर्षी निधन झालं असून बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

कुकू कोहली यांचं निधन
चित्रपट निर्माते आणि जवळचे मित्र अशोक पंडित यांनी कुकू कोहली यांच्या निधनाची बातमी केली. त्यांनी सांगितलं की, कोहली यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु त्यांना वाचवता आलं नाही. पंडित यांनी पुढे सांगितलं की, कुकू कोहली यांची प्रकृती उत्तम होती. कुकू कोहली अनेक वर्षांपासून इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी होते.
Shekhar Phadke : ‘काही चॅनलवर मला काम मिळत नाही, 10-12 वर्षांपूर्वी न सांगता मालिकेतून काढण्यात आलेलं’, मराठी अभिनेत्याचं वक्तव्य
कुकू कोहली यांचा जन्म ४ जून १९४९ रोजी पेशावर येथे झाला. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी राज कपूर यांच्यासोबत काम केलं. ‘बॉबी’, ‘सत्यम शिवम सुंदरम’ आणि ‘प्रेम रोग’ यांसारख्या चित्रपटांच्या निर्मिती प्रक्रियेत काम करताना त्यांना दिग्दर्शन आणि चित्रपट निर्मितीचे बारकावे शिकण्याची संधी मिळाली. यानंतर त्यांनी राहुल रवैल यांच्यासोबतही काम केलं. ‘लव्ह स्टोरी’ आणि ‘बेताब’ यांसारख्या चित्रपटांमध्ये नवोदित कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव त्यांना मिळाला.
Kriti Sanon : ‘स्त्रियांनी काय घालावं हे सांगणं कधी थांबवणार? संस्कृतीचा आदर तिच्या मनात असतो’, कंगनाच्या टीकेवर क्रितीचं सडेतोड उत्तर
कुकू कोहली यांच्या करिअरमधील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे १९९१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘फूल और कांटे’ हा सिनेमा. या चित्रपटातून अजय देवगणनं अभिनेता म्हणून पदार्पण केलं. अजय देवगण हा या चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हता. कुकू कोहली यांनी २०२५ मधील एका मुलाखतीत सांगितलेलं की, सुरुवातीला अक्षय कुमारची स्क्रीन टेस्ट घेण्यात आली होती आणि त्याची चित्रपटासाठी निवडही झाली होती. मात्र, काही कारणांमुळे त्याला प्रोजेक्टमधून बाहेर पडावं लागलं. त्यानंतर कुकू कोहली यांनी अजय देवगणला संधी दिली. अजय देवगणनंही नंतर एका मुलाखतीत कुकू कोहलींचे कौतुक केलं होतं. ‘फूल और कांटे’च्या यशानंतर कुकू कोहली यांनी अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. त्यातील ‘सुहाग’ हा विशेष महत्त्वाचा ठरला. १९९४ मध्ये आलेल्या या चित्रपटात अजय देवगण आणि अक्षय कुमार पहिल्यांदा एकत्र पडद्यावर दिसले.
Ayush Bhide Interview : कानफटात मारावीशी वाटते, आयुष भिडेला निगेटिव्ह रोलमुळे भन्नाट कमेंट्स
करिश्मा कपूर आणि नगमा यांच्याही प्रमुख भूमिका असलेल्या ‘सुहाग’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हा १९९४ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. पुढे अजय आणि अक्षयची जोडी अनेक चित्रपटांमध्ये पुन्हा पाहायला मिळाली. यानंतर कुकू कोहली यांनी ‘झुल्मी’, ‘अनारी नंबर १’, ‘ये दिल आशिकाना’ आणि ‘वो तेरा नाम था’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं. मात्र, ‘फूल और कांटे’ आणि ‘सुहाग’ने मिळवून दिलेली लोकप्रियता त्यांच्या पुढील चित्रपटांना मिळाली नाही.
Rajiv Kapoor : ‘कपूर’ घराण्यातील अभिनेता, अपयशाचं खापर वडिलांवर फोडलं, लग्नाच्या 2 वर्षात काडीमोड अन् दारूच्या आहारी; वयाच्या 58व्या वर्षी मृत्यू
कुकू कोहली त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले. अभिनेत्री अरुणा इराणी आणि कुकू कोहली यांनी १९९० मध्ये लग्न केलं. त्यांच्या नात्याची सुरुवात चित्रपटाच्या सेटवर झाली होती. दरम्यान, कुकू कोहली यांच्या निधनानं अरुणा इराणी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून चाहते आणि कलाकार दिग्दर्शकाला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

