सुरुवातीला त्या स्थानिक जत्रेमध्ये त्यांचे प्रोडक्ट्स विकू लागल्या. या दरम्यान वस्तूंच्या किंमती ठरवण्याचा अंदाज नसल्यामुळे त्यांना तोट्याचा सामना करावा लागला. पुढे त्यांचे पती Dharmveer Bector यांनी त्यांना मार्गदर्शन दिले तसेच व्यवसाय उभारण्यासाठी 20,000 रुपये दिले. घरातून सुरू झालेल्या छोट्या व्यवसायाला येथून उभारी मिळाली. या पैशातून रजनी यांनी आईस क्रीम युनिट सुरू केला. यात यश मिळाल्यानंतर काही वर्षांनी ब्रेड युनिट सुरू केला. आधी ते दिवसाला 5000 युनिट ब्रेड तयार करू लागले. हळूहळू व्यवसायात वाढ होत गेली. एक वेळ अशी आली की त्यांच्या युनिटमध्ये दररोज 50,000 ब्रेड तयार होऊ लागले.
इथेच रजनी यांच्या Cremica कंपनीने जन्म घेतला. पुढे त्यांचा हा व्यवसाय बिस्किट क्षेत्रामध्येही झेप घेऊ लागला. रजनी यांच्या व्यवसायाला खरी झेप तेव्हा मिळाली जेव्हा भारतात मॅकडॉनल्ड’s ने एंट्री घेतली. रजनी यांची Cremica मॅकडॉनल्ड’s ची बन पुरवठादार बनली. पुढे Cremica ने Quaker Oats सह Joint Venture उभारून केचप तसेच मेयोनीज तयार करण्यास सुरुवात केली.
या कंपनीचे तीनदा नाव बदलण्यात आले होते. 2001 साली कंपनीचे शेवटचे नाव बदलण्यात आले असून ते Mrs Bectors Food Specialities Limited असे करण्यात आले होते. यावेळी फक्त रजनी नव्हे तर त्यांचे कुटुंबीयही व्यवसायात उतरले होते. आज कंपनीचे Cremica आणि English Oven असे दोन Brands आहेत. आज त्यांचा व्यवसाय भारताबाहेरही विस्तारला आहे. आज या कंपनीचे बाजारमूल्य 7,890 कोटी रुपये इतके आहे.
आधी इथेनॉल, मग कमी उत्पादन, आता नवे कारण समोर; देशातली प्रमुख साखर उद्योग संस्था स्पष्टच म्हणाली1970 साली अगदी 300 रुपयांच्या Oven पासून झालेली सुरुवात आज हजारो कोटींचा व्यवसाय करत आहे. पंजाबच्या लुधियानाच्या मातीत उभारलेल्या व्यवसायाने आज इतर देशांमध्येही पंख पसरले आहेत. मुळात, 1970 साली सुरू झालेल्या या प्रवासाला मोठ्या साम्राज्याचे रूप घेण्यास अनेक दशके लागली. यामागे रजनी बेक्टर यांच्या ध्येय, जिद्द आणि चिकाटीने तसेच कुटुंबियांच्या पाठिंब्याने महत्वाची भूमिका बजावली आहे. 2020 मध्ये Mrs Bectors Food Specialities Limited शेअर बाजारात लिस्ट झाली होती. त्याकाळी आयपीओच्या माध्यमातून कंपनीने 540 कोटी रुपये उभारले होते.

