Kriti Sanon Post : रक्षाबंधनाच्या निमित्तानं क्रिती सेनननं एक जाहिरात केली. त्या जाहिरातीतील कपड्यांवरून अभिनेत्रीला ट्रोल करण्यात आलं. यावर आता क्रितीनं उत्तर दिलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – रक्षाबंधनानिमित्त एका दागिन्यांच्या ब्रँडसाठी केलेल्या जाहिरातीमुळे अभिनेत्री क्रिती सेनन चर्चेत आली आहे. जाहिरातीतील तिच्या पोशाखावर काही नेटकऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतनंही या मुद्द्यावरून टीका केली. आता क्रितीनं सोशल मीडियावर पोस्ट करत या वादावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
क्रिती सेननचं सडेतोड उत्तर
क्रिती सेनन एका ज्वेलरी ब्रँडच्या रक्षाबंधन विशेष जाहिरातीत दिसली होती. या जाहिरातीत तिनं ऑफ-व्हाइट रंगाचा ब्रालेट-स्टाइल ब्लाऊज परिधान केलेला. अभिनेत्रीच्या या लूकमुळे सोशल मीडियावर काही जणांनी जाहिरातीवर नाराजी व्यक्त केली. तसेचं कंगना रणौतनंही यावर प्रतिक्रिया दिली. ‘तुम्ही तुमच्या भावाला बिकिनी किंवा अंतर्वस्त्रांमध्ये राखी का बांधाल?’ असा प्रश्न कंगनानं उपस्थित केला. यावर आता प्रतिक्रिया देत क्रिती सेनन म्हणाली की, ‘सणांचा खरा अर्थ तुम्ही नेमकं कसे कपडे घालता यात नसून, त्या परंपरेबद्दल तुमच्या मनात असलेल्या भावना आणि नात्यांमध्ये असतो.’
Miss World स्पर्धेत मानुषी छिल्लरने सादर केलेले डान्स Nakul Ghanekar याने केलेले कोरिओग्राफ
‘रक्षाबंधन हे संरक्षणाचं नातं आहे. माझी बहीण आणि मी एकमेकींना राखी बांधतो. भाऊ जसा आपल्या बहिणीचं रक्षण करू शकतो, तसंच आम्हीही एकमेकींचं रक्षण करू शकतो, याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही बहिणी एकमेकींच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. आमच्यासाठी ही प्रार्थना आणि हेच वचन आमच्या श्वानासाठीसुद्धा आहे, कारण शेवटी तोही आमच्या कुटुंबाचाच भाग आहे.’
कंगनानं क्रितीचं थेट नाव न घेता सोशल मीडियावर पोस्ट करत जाहिरातीतील पोशाखावर प्रश्न उपस्थित केला. कंगना म्हणाली की, ‘स्त्रियांसाठी हा खूप चांगला काळ आहे, आपल्या कपाटात वेगवेगळ्या कपड्यांचे अनेक पर्याय आहेत. आजची महिला ही जागतिक महिला आहे. कॉकटेल ड्रेसेसपासून ते लहेंगा चोली, जीन्स ते साडी आणि बिकिनीपासून ते सलवार कमीजपर्यंतचे अनेक पर्याय आज उपलब्ध असताना, तुम्ही तुमच्या भावाला बिकिनी किंवा अंतर्वस्त्रांमध्ये राखी का बांधाल? तुमचे इतर स्टायलिंगचे पर्याय कुठे गेले? ही जाहिरात हेतूपूर्वक विचित्र केलेली वाटत आहे.’
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा