8th Pay Commission Fitment Factor: आठव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर कमी होऊनही केंद्रीय कर्मचाऱ्यांना दुप्पट पगारवाढ मिळू शकते. 2.1 फिटमेंट फॅक्टर सातव्या वेतन आयोगाच्या 2.57 पेक्षा कमी वाटू शकतो, पण कर्मचारी संघटनेच्या एका प्रतिनिधीनुसार सध्याचा महागाई भत्ता (DA) विचारात घेतल्यास प्रत्यक्ष जास्त आर्थिक लाभ मिळू शकतो.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टरची चिंता
31 डिसेंबर 2025 रोजी कालबाह्य झालेल्या सातव्या वेतन आयोगात 2.37 फिटमेंट फॅक्टर लागू केला गेलेला तर आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.1 पर्यंत कमी केल्यास पगारवाढ कमी होईल का? अशी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक पगारवाढीची आतुरतेने वाट पाहत आहेत, पण फिटमेंट फॅक्टरबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. एनसी-जेसीएमने 3.833 फिटमेंट फॅक्टरचा प्रस्ताव मांडला असून सरकार सातव्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या फिटमेंट फॅक्टरपेक्षाही कमी फिटमेंट फॅक्टर देऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच आठव्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर सातव्या वेतन आयोगाइतकाच असला तरी, कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन दुप्पट होऊ शकते असे त्यांचे म्हणणे आहे.
सातव्या वेतन आयोगात काय घडलेलं?
याआधी 7 व्या वेतन आयोगादरम्यान फिटमेंट फॅक्टर 2.57 निश्चित केलेला, ज्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 7000 रुपयांवरून 18000 पर्यंत वाढलेले. पण ही वाढ अशा वेळी झाली, जेव्हा महागाई भत्ता आधीच जुन्या मूळ वेतनाच्या 125%, म्हणजेच 8,750 रुपयांवर पोहोचला होता. म्हणजे DA ॲडजस्ट केल्यावर कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात केवळ 2,250 रुपये अतिरिक्त वेतनाचा लाभ मिळाला होता.
आठव्या वेतन आयोगाचा फायदा कसा होईल?
ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मनजीत सिंग पटेल म्हणतात की, आठव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आणि अधिक फायदेशीर ठरू शकते. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी सांगितले की, फिटमेंट फॅक्टर पूर्वीपेक्षा कमी असला तरी, आठवा वेतन आयोग मागील वेतन आयोगापेक्षा निश्चितपणे अधिक फायदे देईल आणि संपूर्ण कॅलक्युलेशनही स्पष्ट केले.
- 8व्या वेतन आयोगात किमान फिटमेंट फॅक्टर 2.1 राहिल्यास किमान मूळ वेतन 18000 रुपयांवरून सुमारे 38000 रुपयांपर्यंत वाढेल.
- सध्या महागाई भत्ता 58% आहे, जो सध्याच्या मूळ वेतनावर सुमारे 10,400 रुपये होतो.
- अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना नव्याने अतिरिक्त सुमारे 9,560 रुपयांचा लाभ होईल.
- म्हणजे सातव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना सुमारे 32% फायदा मिळाला होता, तर आठव्या वेतन आयोगात 2.1 कमी फिटमेंट फॅक्टर असूनही 53% पर्यंत फायदा मिळू शकतो.
साखरेपाठोपाठ कांदाही सुसाट! चालवली जातेय स्पेशल ट्रेन, नक्की काय आहे ‘कांदा एक्सप्रेस’?
2.1 फिटमेंट फॅक्टरमुळे मूळ पगारात कसा बदल होईल?
लक्षात घ्या की केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 2.1 फिटमेंट फॅक्टर मंजूर केल्यास विविध स्तरांवरील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात खालील संभाव्य बदल होऊ शकतात:
| ग्रेड | सध्याचे किमान वेतन (मूळ पगार) | संभाव्य किमान वेतन (मूळ पगार) |
| लेव्हल 1 | 18,000 रुपये | 37,800 रुपये |
| लेव्हल 2 | 19,900 रुपये | 41,790 रुपये |
| लेव्हल 3 | 21,700 रुपये | 45,570 रुपये |
| लेव्हल 4 | 25,500 रुपये | 53,550 रुपये |
| लेव्हल 5 | 29,200 रुपये | 61,320 रुपये |
| लेव्हल 6 | 35,400 रुपये | 74,340 रुपये |
| लेव्हल 7 | 44,900 रुपये | 94,290 रुपये |
| लेव्हल 8 | 47,600 रुपये | 99,960 रुपये |
| लेव्हल 9 | 53,100 रुपये | 1,11,510 रुपये |
| लेव्हल 10 | 56,100 रुपये | 1,17,810 रुपये |
| लेव्हल 11 | 67,700 रुपये | 1,42,170 रुपये |
| लेव्हल 12 | 78,800 रुपये | 1,65,480 रुपये |
| लेव्हल 13 | 1,23,100 रुपये | 2,75,310 रुपये |
| लेव्हलl 14 | 1,44,200 रुपये | 3,02,820 रुपये |
| लेव्हल 15 | 1,82,200 रुपये | 3,82,620 रुपये |
| लेव्हल 16 | 2,05,400 रुपये | 4,31,340 रुपये |
| लेव्हल 17 | 2,25,000 रुपये | 4,72,500 रुपये |
| लेव्हल 18 | 2,50,000 रुपये | 5,25,000 रुपये |

