Headlines

नागपूरमध्ये विमान उड्डाणांना अडथळा ठरतोय मटण बाजार ;विमानांना पक्षी धडकण्याच्या घटना जास्त,प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर


Nagpur Airport News: विमानांना पक्षी धडकण्याचा घटना घडतात पण नागपूर विमानतळावरुन पक्षी विमानांना धडकण्याच एक वेगळच कारण समोर आल आहे.विमानतळाच्या आजूबाजूला असलेला बेकायदा मटन बाजार अस्ताव्यस्त कचरा आणि उंच इमारती या घटनांना कारणीभूत ठरत आहे.यामुळे प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.

प्रवाश्यांची सुरक्षा वाऱ्यावर (1)
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा. प्रतिनिधी,नागपूर :नागपूरमध्ये हवाई वाहतुकीचा विस्तार वेगाने होत असून प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. परंतु, दुसऱ्या बाजूला विमानतळावरील सुरक्षिततेचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. विमानतळाच्या आजूबाजूला असलेला बेकायदा मटण बाजार, अस्ताव्यस्त कचरा आणि उड्डाण मार्गातील उंच इमारतींमुळे विमान आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला असल्याचा दावा ग्रुप कॅप्टन (निवृत्त) विजय हरदास यांनी केला आहे.

बेकायदा मटण बाजार आणि आठवडी बाजार हे विमानांसाठी मोठे संकट

विमानाच्या उड्डाण सुरक्षितता क्षेत्राच्या अगदी जवळ असलेला बेकायदा मटण बाजार आणि आठवडी बाजार हे विमानांसाठी मोठे संकट ठरत आहेत. या बाजारातील खाद्यपदार्थ आणि परिसरात पसरलेला कचरा पक्ष्यांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करतो. यामुळे विमानांना पक्षी धडकण्याच्या घटना घडतात. अलीकडेच अशा दोन घटना घडल्याने या चिंतेत भर पडली आहे.

ऑक्सिजन पार्क भविष्यात स्थानिक स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करणार

याव्यतिरिक्त,मटण बाजारात उपलब्ध असलेल्या अन्नामुळे भटके कुत्रे आकर्षित होतात व काही वेळा ते थेट विमानतळाची धावपट्टी ओलांडतानाही दिसतात, जे विमानासाठी अत्यंत घातक ठरू शकते. विमानांच्या उड्डाण आणि ये-जा करण्याच्या मार्गावर उभारण्यात आलेल्या बहुमजली इमारती विमानांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. तसेच, नव्याने सुरू झालेल्या महामार्गावरील ऑक्सिजन पार्क भविष्यात स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करणार आहे.

पक्षी धडकण्याच्या घटनांचे केंद्र

त्यामुळे तेथे पक्षी धडकण्याच्या घटनांचे केंद्र बनण्याची शक्यता आहे. याशिवाय विमानतळालगतच्या २७१ हेक्टर जमिनीवर प्रस्तावित असलेल्या व्यावसायिक, औद्योगिक आणि निवासी विकासामुळे सुरक्षेचे नियोजन अधिक आव्हानात्मक ठरणार आहे.

Maharashtra TimesBhuleshwar Cha Raja : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेश मंडळावर ‘लालबागचा राजा’चं वडिलकीचं छत्र, नेवशे-जोशी कुटुंबीयांना मदतीचा हात, मंडळाला 11 लाखांचा निधी

व्हाव्यात नियमित समन्वय बैठका

सध्या नागपूर विमानतळावरून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय मार्गांवर सेवा उपलब्ध असून दररोज सुमारे ३१ ते ३५ उड्डाणे हाताळली जातात. विमानांची आणि प्रवाशांची संख्या वाढत असताना अपघाताची शक्यताही वाढते. मात्र, नागपूर महानगरपालिका हा मटण बाजार स्थलांतरित करण्यात आणि कचरा व्यवस्थापन करण्यात अद्याप अपयशी ठरली आहे.

Maharashtra TimesAmravati Hospital Fire : कोट्यावधी रुपये खर्चले नव्या इमारतीवर पण अखेर घटनेची पुनरावृत्ती झालीच ; नव्या इमारतीतही जुनेच मरण !

मनपाच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष

इमारतींच्या उंचीबाबत असलेल्या नियमांकडे मनपाच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विमान वाहतूक सुरक्षित करण्यासाठी मनपा, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, हवाई वाहतूक नियंत्रण आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय या सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. नियमित समन्वय बैठका आयोजित करणे आवश्यक आहे, याकडे ग्रुप कॅप्टन (निवृत्त) विजय हरदास यांनी लक्ष वेधले आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा