Headlines

सॅमसंग गॅलेक्सी S27 अल्ट्राचा लूक बदलणार; नव्या कॅमेरा प्लॅटू, मॅग्नेटिक चार्जिंगसह डिझाईन लीक। Maharashtra Times


Samsung Galaxy S27 Ultra Leaks: सॅमसंग कंपनी आपल्या आगामी ‘सॅमसंग गॅलेक्सी S27 अल्ट्रा’ स्मार्टफोनमध्ये अनेक वर्षांनंतरचा सर्वात मोठा डिझाईन बदल करण्याच्या तयारीत आहे. प्रसिद्ध टिपस्टर ‘आइस युनिव्हर्स’ने लीक केलेल्या माहितीनुसार, यावेळी फोनच्या मागील बाजूला स्वतंत्र कॅमेरा रिंग्ज ऐवजी एक मोठा, युनिफाइड कॅमेरा प्लॅटू (कॅमेरा बंप) पाहायला मिळू शकतो. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

Samsung Galaxy S27 Ultra Leaks। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
Samsung Galaxy S27 Ultra Leaks: गॅलेक्सी S27 अल्ट्राच्या लीक झालेल्या माहितीमुळे टेक जगतात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या नव्या फ्लॅगशिप फोनमध्ये केवळ कॅमेरा डिझाईनमध्येच मोठा फेरबदल होणार नाही, तर वायरलेस चार्जिंग अधिक सुलभ करण्यासाठी ‘Qi2 मॅग्नेटिक चार्जिंग ‘ तंत्रज्ञानाचा सपोर्ट देखील दिला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सॅमसंग कंपनी आपल्या आगामी अत्यंत प्रीमियम अशा Samsung Galaxy S27 Ultra स्मार्टफोनमध्ये गेल्या अनेक वर्षांतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा डिझाईन बदल करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सॅमसंग आपल्या पारंपरिक कॅमेरा डिझाईनला पूर्णपणे फाटा देणार आहे. गेल्या काही वर्षांपासून गॅलेक्सी अल्ट्रा सिरीजमध्ये दिसणाऱ्या स्वतंत्र कॅमेरा रिंग्जऐवजी (Separate Camera Rings), यावेळी पाठीमागे एक मोठा आणि एकत्र जोडलेला ‘युनिफाइड कॅमेरा प्लॅटू’ (Unified Camera Plateau) म्हणजेच कॅमेरा बार दिला जाईल.

आयफोन 17 प्रो सारखे कॅमेरा डिझाईन

‘फोन अरेना’ च्या एका रिपोर्टनुसार, आगामी गॅलेक्सी S27 अल्ट्राच्या मागील पॅनेलवर आयफोन 17 प्रो (iPhone 17 Pro-esque) सारखा किंवा गुगल पिक्सेलसारखा आडव्या आकाराचा (Horizontal) कॅमेरा बार पाहायला मिळू शकतो. लीक झालेल्या स्केचचे बारकाईने निरीक्षण केले असता, यामध्ये उजव्या बाजूला एकाखाली एक (Vertically Stacked) असे दोन कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तर डाव्या बाजूला एक लांबट आकाराचा आयलंड (Elongated Island) आहे, ज्यामध्ये तिसरा मुख्य कॅमेरा आणि फ्लॅश युनिट समाविष्ट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टिपस्टरने अधिकृतपणे या फोनचे नाव उघड केले नसले, तरी सॅमसंगच्या आगामी गॅलेक्सी फ्लॅगशिप स्मार्टफोनचेच हे नवीन डिझाईन असल्याचे स्पष्ट होत आहे.

50MP कॅमेरा, Qi2 मॅग्नेटिक चार्जिंग

‘Sunday Guardian Live’ ने दिलेल्या वृत्तानुसार, या डिझाईन ओव्हरहॉल व्यतिरिक्त फोनच्या अंतर्गत हार्डवेअरमध्येही सॅमसंग मोठे फेरबदल करत आहे. सॅमसंग आपल्या जुन्या 10 मेगापिक्सेल (10MP) 3x टेलिफोटो लेन्सऐवजी आगामी गॅलेक्सी S27 अल्ट्रामध्ये एक नवीन 50 मेगापिक्सेल (50MP) 5x टेलिफोटो कॅमेरा समाविष्ट करणार आहे, ज्यामुळे युजर्सना अप्रतिम हाय-रिझोल्युशन झूम आणि लो-लाइट फोटोग्राफीचा अनुभव मिळेल.

याशिवाय, संडे गार्डियनने या फोनमधील दुसऱ्या एका मोठ्या फीचर्सचा खुलासा केला आहे, तो म्हणजे Qi2मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग ( Qi2 Magnetic Charging ) तंत्रज्ञानाचा समावेश. ॲपलच्या मॅगसेफ (MagSafe) तंत्रज्ञानासारखेच हे फीचर काम करेल. यामुळे फोन वायरलेस चार्जर किंवा इतर मॅग्नेटिक ॲक्सेसरीजला अचूकपणे आणि घट्टपणे चिकटून राहील, ज्यामुळे चार्जिंग दरम्यान निर्माण होणारी उष्णता कमी होईल आणि बॅटरी सुरक्षित राहील.

प्रक्षेपणाची तारीख आणि बाजारपेठेतील स्पर्धा

सॅमसंग गॅलेक्सी S27 अल्ट्रा हा फोन नेहमीच्या परंपरेनुसार 2027 च्या सुरुवातीला होणाऱ्या ‘गॅलेक्सी अनपॅक्ड’ (Galaxy Unpacked) इव्हेंटमध्ये जागतिक स्तरावर लाँच केला जाण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये क्वालकॉमचा आगामी अत्यंत शक्तिशाली असा स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि अपग्रेड केलेली मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.

सॅमसंगच्या या धाडसी आणि नवीन कॅमेरा बार डिझाईनमुळे प्रीमियम स्मार्टफोन मार्केटमध्ये विशेषतः ॲपल आणि गुगल पिक्सेलला मोठी टक्कर मिळण्याची चिन्हे आहेत.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी हे गेल्या नऊ वर्षांहून अधिक काळ मुख्य प्रवाहातील माध्यम क्षेत्रात सक्रिय असलेले एक व्यासंगी पत्रकार आहेत. सध्या ते ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या ‘टेक आणि सायन्स’ विभागात कन्सल्टंट म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत. तंत्रज्ञान विश्वातील वेगाने बदलणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे प्रगत तंत्रज्ञान, नवनवीन गॅझेट्स, टेक ट्रेंड्स, स्मार्टफोन रिव्ह्यूज आणि सायन्स क्षेत्रातील क्लिष्ट वैज्ञानिक घडामोडी अतिशय सोप्या, सर्वसामान्यांना समजेल अशा रंजक भाषेत मांडण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. डिजिटल मीडियातील अचूक SEO आणि Google Discover च्या बदलत्या अल्गोरिदमचा वापर करून लाखो वाचकांपर्यंत तांत्रिक माहिती पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित ‘MGM’ संस्थेतून ‘एम.ए. पत्रकारिता आणि जनसंवाद’ ही मास्टर पदवी संपादन केल्यानंतर, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘आकाशवाणी’ या प्रतिष्ठित संस्थेतून केली. 2017 मध्ये त्यांनी ‘दैनिक सामना’ या अग्रगण्य मुखपत्रात प्रवेश करत वृत्तपत्र पत्रकारितेचा भक्कम पाया रचला. त्यानंतर मुंबईतील ABP माझा, TV9 मराठी, साम TV, पुढारी न्यूज चॅनेल आणि लोकशाही न्यूज या महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. राजधानी दिल्ली येथे ‘News Nation Marathi’ साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या न्यूज बुलेटिन्सचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाच्या सखोल अनुभवामुळे राजकारण, व्यापार-उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, सायबर सुरक्षा आणि लाइफस्टाईल क्षेत्रातील गुंतागुंतीच्या विषयांचे अचूक विश्लेषण करणे ही त्यांची प्रमुख ओळख आहे. पत्रकारितेच्या या व्यस्त प्रवासातून वेळ काढत, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे हा त्यांचा छंद आहे.आणखी वाचा