Headlines

Manasi Salvi : ‘मला निघून जायला सांगितलं’, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला आला हिंदी मालिकेच्या सेटवर वाईट अनुभव


Manasi Salvi On Hindi Serial : मराठी अभिनेत्री मानसी साळवीनं ‘महादेव अँड सन्स’ ही मालिका अचानक सोडली. यामागचं कारण तिनं एका मुलाखतीत सांगितलंय.

Manasi Salvi On Hindi Serial
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी तसेच हिंदी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री मानसी साळवी सध्या चर्चेत आहे. ‘महादेव अँड सन्स’ या हिंदी मालिकेत भानू बाजपेयीची भूमिका साकारणाऱ्या मानसीनं अचानक मालिकेतून एक्झिट घेतल्यानं चाहत्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र आता अभिनेत्रीनं मालिका सोडण्याचं कारण सांगितलं आहे.

मानसीनं सांगितलं हिंदी मालिका सोडण्याचं कारण

मानसी साळवीनं ‘महादेव अँड सन्स’ या मालिकेत भानूची महत्वपूर्ण भूमिका साकारलेली. या व्यक्तिरेखेतून तिनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पण, अभिनेत्रीच्या एक्झिटमुळे प्रेक्षकांना धक्का बसला. सुरुवातीला मानसीच्या कामाचे दिवस आणि स्क्रीन टाइम कमी झाल्याची चर्चा होती. त्यानंतर निर्माते आणि अभिनेत्री यांच्यातील मतभेदांचीही चर्चा रंगली. मालिका सोडण्याचं कारण सांगताना मानसी म्हणाली की, ‘नखरे केले असते तर ३० वर्षे इंडस्ट्रीत टिकले नसते.’

Ayush Bhide Interview : कानफटात मारावीशी वाटते, आयुष भिडेला निगेटिव्ह रोलमुळे भन्नाट कमेंट्स

पुढे मुलाखतीदरम्यान मानसीला ‘तू अचानक मालिकेतून गायब का झालीसं?’ असं विचारलं असता अभिनेत्री म्हणाली की, ‘मला निघून जायला सांगितलं होतं. त्यामुळे मी मालिका सोडली. काही गोष्टी घडतात. पण मी माझ्या सोशल मीडियावर याबद्दल माझ्या परीनं सर्व गोष्टी माझ्या चाहत्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला होता. पण अशा छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात.’

Maharashtra TimesAayush Bhide : ‘तो खूप वाईट काळ होता’, करोनात आई-वडिल गेले, न खचता आयुषनं पूर्ण केलं बाबांचं स्वप्न, सांगितला कठीण काळ
‘एका युनिटमध्ये ८० लोक असतात. त्यामुळे कोणा एकाच्या बोलण्यामुळे गोष्ट बदलत नाही. माध्यमांना आतल्या गोष्टी माहीत असतातच कोणाचे नखरे असतात, कोणाचे नसतात. त्यामुळे जर नखरे केले असते तर ३० वर्षे इंडस्ट्रीत टिकले नसते. मी माझं काम करते आणि मला माझं काम काय आहे हेही माहीत आहे.’ असं मानसी शेवटी म्हणाली. ‘टेली मसाला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मानसी बोलत होती.

Maharashtra TimesRajesh Kumar : सद्गुरूंचा सल्ला लोकप्रिय अभिनेत्यासाठी ठरला चुकीचा! कर्जबाजारी झाला, लेकाच्या शाळेबाहेर विकल्या भाज्या; काय घडलेलं?
दरम्यान, मानसी साळवीच्या कामाबद्दल सांगायचं तर अभिनेत्री लवकरच झी टीव्ही वाहिनीवरील ‘दिलो की राम लीला’ या नवीन मालिकेत झळकणार आहे. तसंच अभिनेत्रीनं यापूर्वी ‘काय घडलं त्या रात्री?’, ‘कोई अपना सा’, ‘डोली अरमानो की’, ‘वो अपना सा’ यांसारख्या हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा