Headlines

Varsha Usgaonkar : ‘सेटवर आम्ही बोलायचो नाही, माझ्या मनात उगाच तेढ निर्माण झालेली’, वर्षा उसगांवकरांनी सांगितलं अश्विनी भावेंसोबत न बोलण्याचं कारण


Varsha Usgaonkar : सिनेमाच्या सेटवर वर्षा उसगांवकर आणि अश्विनी भावे एकमेकींसोबत बोलायच्या नाहीत. एका मुलाखतीत वर्षा उसगांवकर यांनी यामागचं कारण सांगितलं आहे.

Varsha Usgaonkar On Ashwini Bhave
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि अश्विनी यांनी आजवर अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. वर्षा उसगांवकर आणि अश्विनी भावे एकमेकींच्या स्पर्धक होत्या. त्यांच्यात मैत्री कधीच नव्हती. अशातच आता वर्षा उसगांवकर यांनी अश्विनी भावे यांच्यासोबतच्या मैत्रीवर भाष्य केलं आहे.

अश्विनी भावे यांच्याबद्दल काय म्हणाल्या वर्षा उसगांवकर?

मुलाखतीदरम्यान वर्षा उसगांवकर म्हणाल्या की, ‘अश्विनी भावे आणि माझ्यात कॅट फाइट नव्हती. पण, आमच्यात सगळं काही चांगलं पण नव्हतं. आम्ही अनेक सिनेमे एकत्र केले. आम्ही ‘हनिमून’ हा हिंदी चित्रपट एकत्र केला. त्यात ती माझी बहीण होती. सिनेमात आम्ही एकमेकींवर खूप प्रेम करायचो. पण, तरी आमच्यातलं ते प्रेम दिग्दर्शकाला दिसत नव्हतं. ती एका कोपऱ्यात आणि मी एका कोपऱ्यात बसायचे. याचं कारण काय? तर काहीच नाही. आमच्यात भांडणं नव्हती. पण, आम्ही एकमेकींच्या स्पर्धक होतो.’

वर्षा उसगांवकर यांचा सिनेसृष्टीतील भन्नाट किस्सा, दिग्दर्शकालाही कळलेलं… शूटिंग दरम्यान नेमकं काय घडलेलं?

‘अश्विनीनं ऋषी कपूर यांचा ‘हिना’ सिनेमा साइन केला. त्यामुळे मला उगाचच एक तेढ निर्माण झाली. हे स्वतःला समजतात काय. अश्विनी काय समजते स्वतःला आणि ऋषी कपूर तिच्याशी छान बोलायचा आणि माझ्याशी त्याची एवढी काही मैत्री नव्हती. त्यामुळे मला राग यायचा. अश्विनीत काय असं खास आहे, ज्यामुळे हा तिच्याशी बोलतो. त्यामुळे तेढ निर्माण झाली.’

Maharashtra TimesRajesh Kumar : सद्गुरूंचा सल्ला लोकप्रिय अभिनेत्यासाठी ठरला चुकीचा! कर्जबाजारी झाला, लेकाच्या शाळेबाहेर विकल्या भाज्या; काय घडलेलं?
वर्षा पुढे म्हणाल्या की, ”हनिमून’ सिनेमात कादर खान आमच्या वडिलांचं काम करायचे. आम्ही असेच जेवायला एकत्र बसलो तर कादर खान मला बघायला लागले आणि अश्विनीकडे बघायला लागले. त्यांनी विचारलं काय तुम्ही एकमेकींसोबत बोलत नाही? आम्ही एकमेकींकडे बघायला लागलो. मग आम्ही आपलं, नाही तसं काही नाही, असं बोलून वेळ मारून नेली.’

Maharashtra TimesSneha Wagh : दोन लग्न अन् घटस्फोट, अध्यात्माकडे वळली मराठमोळी अभिनेत्री, वृंदावनामुळे बदललं आयुष्य; म्हणाली, ‘कोणत्याही नात्याची गरज नाही’
‘फोटोशूट होतं तेव्हाही ती एकीकडे मी एकीकडे. नाही म्हटलं तरी असं झालं. का झालं तर काही कारणच नाही. फक्त काहीतरी लिहून आलं मग माझा इगो दुखावला गेला. तिचा इगो दुखावला गेला. नंतर काही वर्षांनी तिचं लग्न झालं. आता जेव्हा एकमेकींना भेटतो, तेव्हा वाटतं किती बालीशपणा होता. ती कॅट फाइट नव्हती, पण प्रोफेशनल जेलसी होती. अल्लडपणा होता. त्या वयात ते होतं, असं मी म्हणेन. पण आता मला अश्विनीबद्दल कौतुक वाटतं. ती तिच्या युट्युबवर भाज्या दाखवत असते. मी तिचे व्हिडिओ पाहते लाइक करते.’ असं वर्षा उसगांवकर यांनी शेवटी सांगितलं. ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत वर्षा उसगांवकर बोलत होत्या.