Headlines

Rahul Gandhi Pune: राहुल गांधींचा आज पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम; पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था – rahul gandhi visiting pune today 22 august 2026 for chhatron ki goonj program


Rahul Gandhi Pune Visit: या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, पुणे पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Anderson Phillip Catch - 2026-08-22T064441
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी, पुणे: ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज, शनिवारी २२ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत असून, राहुल गांधी यांच्या पुणे स्वागताची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे.

‘आरटीओ’जवळील एआयएसएसएमएस शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम होणार असून, त्यासाठी सुमारे ५०० पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी ४२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याने गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांनी विशेष व्यवस्था केली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेशद्वार, वाहनतळ, प्रमुख चौक; तसेच परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस तैनात असतील. कार्यक्रमस्थळी येणाऱ्या वाहनांची तपासणी आणि पार्किंग व्यवस्थेवरही पोलिसांचे लक्ष राहणार आहे. दरम्यान, कार्यक्रमामुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने वाहतूक व्यवस्थेसाठी सुमारे ७०० वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.

Maharashtra TimesPune News : पुण्यात राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमापूर्वी तणाव, ABVP आणि NSUI भिडलेविद्यापीठात ‘युवा की आवाज’

युवकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासोबतच राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘वंदे मातरम् कृती समिती, पुणे’ यांच्या वतीने ‘युवा की आवाज’ या विशेष कार्यक्रमाचे आज, शनिवारी आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात सायंकाळी पाच वाजता संपूर्ण वंदे मातरम् चे सामूहिक गायन; तसेच देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

Maharashtra TimesPune News : पुण्यात महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर; भाजप नेत्यांवर टीका करणाऱ्या बालवडकर-टिंगरेंचा निधी शून्य‘अभाविप’- ‘एनएसयूआय’ वाद

पुणे : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गूँज’ या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. आज, शनिवारी सायंकाळी गांधी यांचा ‘छात्रों की गूँज’ हा कार्यक्रम होणार आहे. सीओईपी वसतिगृहात शिरून ‘एनएसयूआय’ कार्यकर्ते कार्यक्रमाला येण्यासाठी विद्यार्थ्यांवर जबरदस्ती करीत आहेत. विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देण्यासाठी धमकावण्यात आले, असा आरोप ‘अभाविप’ कार्यकर्त्यांनी केला, तर ‘अभाविप’चे कार्यकर्ते सीओईपी कॉलेजच्या परिसरात आले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना धमकावल्याचा, राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याबाबत धमकावल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला. त्यानंतर माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घटनास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांनी संवाद साधला. काँग्रेस-अभाविपचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा