Pune News: आईचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने २५ वर्षीय मुलाने शनिवारी सकाळी घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. घटनेनं परिसरात हळहळ.

मंदा दोडके (वय ५०) आणि साहिल गणेश दोडके (वय २५, दोघे रा. पर्वती दर्शन) अशी या मायलेकाची नावे आहेत.
दोडके कुटुंब मूळचे दांडेकर पूल परिसरातील रहिवासी आहेत. तिथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू झाल्याने ते काही दिवसांपूर्वीच पर्वती दर्शन परिसरात भाड्याने राहायला आले होते. मंदा दोडके या वृद्ध रुग्णांच्या सेवाशुश्रृषेचे काम करायच्या. चार बहिणींनंतर जन्माला आलेला साहिल एकुलता एक मुलगा होता. पहाटे उठून लोकांच्या घरी दुधाच्या पिशव्या टाकणे आणि लिफ्ट दुरुस्तीची कामे करणे असा त्याचा दिनक्रम होता.
Pune Accident: राजगड किल्ला पाहण्यासाठी निघालेल्या मुंबईतील पर्यटकांच्या खासगी बसला अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
मंदा दोडके यांना गुरुवारी पहाटे अर्धांगवायूचा झटका आला. साहिलने त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती खालावत होती. घटनेच्या दिवशी साहिल आईसाठी चहा घेऊन रुग्णालयात गेला. मात्र, त्याच्या आईचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आईला वाचवू न शकल्याच्या दुःखातून त्याने तातडीने घर गाठले आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी दहाच्या सुमारास नातेवाइकांनी त्याचा दरवाजा ठोठावला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्याच्या भाच्याने दरवाज्याच्या फटीतून पाहिले असता, साहिलने गळफास घेतल्याचे दिसले. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
Pune Crime : लोहगडावरुन ढकल्याचा सराव केला, पोलिसांपासून बचावाची योजना आखली, आईला पहिला फोन; चौकशीत सिया-चेतन फाडफाड बोलले
उपचारांपूर्वी त्याचा मृत्यू
साहिलने गळफास घेतल्याचे समजल्यावर त्याला ससूनमध्ये दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ससूनमध्येच उपचार घेणाऱ्या त्याच्या आईचाही मृत्यू झाल्याची माहिती पर्वती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी दिली.

