Headlines

Balraj Sanghai Column | Importance of First Impression in Communication


58 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

आपण कोणाशी तरी प्रथम संवाद साधत असतो आणि बऱ्याचदा असं होतं की समोरच्या व्यक्तीचा काहीतरी गैरसमज होतो. आणि ती व्यक्ती आपल्या विरोधात जायला लागते. आपल्याविषयी काहीतरी वेगळा विचार समोरच्याच्या मनात उत्पन्न व्हायला लागतो. असे का घडते? याचाही विचार केला पाहिजे.

अर्थातच समोरच्या व्यक्तीची मानसिकता ही देखील महत्त्वाची असते. ती व्यक्ती कशा प्रकारे आपल्याला पाहत आहे? त्याची विचार करण्याची पद्धत कशी आहे? समोरची व्यक्ती शीघ्रकोपीही असू शकते. कोणाकोणाची अशीही समज झाले ली असते की जगातून चांगलेपणा संपूर्णपणे नष्ट झालेला आहे. यात त्यांच्या स्वभावदोषा पेक्षा त्यांना आयुष्यात आलेले अनुभवही कारणीभूत असतात. तरीही तो गैरसमज आपल्या प्रथम संवादातून बराचसा दूर झाला पाहिजे यासाठी आपल्यात देखील काही संभाषण कौशल्य असावी लागतात.

प्रथम संवाद साधताना काही गोष्टींची छाप पडते हे गृहीत धरून आपण बोलायचे असते. कोणाशीही प्रथम संवाद साधताना आपला दृष्टिकोन महत्त्वाचा व संस्कारही. वाकचातुर्य, समजून बोलण्याची पद्धत, आपला Visual Appearance, बोलतानाची शरीराची भाषा म्हणजे बॉडी लँग्वेज, आपले असणे, दिसणे हे सर्व संवादाचे वेळी महत्त्वाचे ठरते. मग तो संवाद कोणाशीही असो.

शेकडो वर्षापासून ची एक मनोवैज्ञानिक सत्यता आहे. डोळ्याला समोर कोणी दिसल्याबरोबर ते कोण काय आहे याचा अर्थ बोध चेतासंस्था मेंदूकडे जाऊन क्षणार्धात अपडेट करते. First Impression, पहिली समज,नोंद. समोर पाहिल्याबरोबर पहिल्यांदा उमजते की स्त्री आहे का पुरुष. मनोवैज्ञानिक दृष्टिकोणानुसार मनुष्यातील वासनेच्या संवेगानुसार हा विचार जन्माला येतो.

स्त्री आणि पुरुष असणे, दिसणे आणि समज, लैंगिक वैविध्य विविधता प्रथमदर्शनी समोर येणे, स्वाभाविक आहे. परंतु त्यानंतर येणारा दुसरा विचार महत्त्वाचा. त्यात वासनेचा अंश आणि त्या प्रकारचा अपेक्षाकृत प्रतिसाद नसावा. एकंदरीत आपली बोली आणि शरीराची भाषा आपल्याबद्दलचा समोरच्या व्यक्तीच्या मनात अभिप्राय बनवत असते.

विषय जास्त न लांबवता मला थोडक्यात हे म्हणायचे आहे की या अस्तित्वाच्या असण्याच्या पलीकडे माणूस केव्हा पोहोचणार? समोर कोण आहे स्त्री की पुरुष हे विसरून किंवा तसा समज न होता एका मानवाशी बोलतो आहोत हा विचार मनात बुद्धीत केव्हा येणार? सोबतही असताना सोबत ती आहे का तो हे विसरून जायला हवं.अशा अवस्थेला आपला विचार कधी पोहोचणार? या दृष्टिकोनातूनच मानवता आणि मैत्री खऱ्या अर्थाने शाश्वत अशी अस्तित्वात येते.

या दृष्टिकोणाने कोणाशी कितीही बोला, सोबत चला, बाहेर जा, फिरून या, काही हरकत नाही. फक्त तो मोकळेपणाचा मानवतावादी दृष्टिकोन हवा. यासाठी मनात, संस्कारात, वागणुकीत राग, द्वेष,अहंकार, लोभ, मोह वासना हे मात्र नसायला पाहिजेत. अशा सहवासाच्या क्षणातच जीवनातील खरी रंगत येते. या निमित्ताने व्यक्त होताना इतकेच मला महत्त्वाचे वाटले.

(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)

(संपर्क- 9420015108)



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत