IND vs SL 2nd Test Playing 11 : भारत आणि श्रीलंका दुसरा कसोटी सामना २३ ऑगस्टला सुरू होणार आहे. पहिला सामना जिंकल्यावरही भारतीय संघात दोन मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ते बदल नेमके काय असणार आहेत जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : ‘श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ‘ऑफ स्पिनर’ सारांश जैन आणि ‘रिस्ट-स्पिनर’ कुलदीप यादव यांच्यापैकी कोणाला निवडायचे, हा भारताचा निर्णय पूर्णपणे सिंहलीज स्पोर्ट्स क्लबच्या खेळपट्टीच्या परिस्थितीवर अवलंबून असेल,’ असे मत श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू रसेल अरनॉल्ड यांनी व्यक्त केले; त्याचबरोबर, शुक्रवारी होणाऱ्या सराव सत्रादरम्यान खेळपट्टी पाहिल्यानंतरच भारतीय संघ व्यवस्थापनाने कुलदीपच्या जागी जैनचा समावेश करण्याबाबत अंतिम निर्णय घ्यावा, असा सल्लाही अरनॉल्ड यांनी दिला.
भारताने गॉल येथील पहिली कसोटी १६५ धावांनी जिंकली. यात मानव सुतारने दहा, तर रवींद्र जाडेजाने चार विकेट घेतल्या. मात्र, कुलदीपलाएकच विकेट मिळाली. पहिल्या डावात त्याने १४ षटकांत ६५ धावा दिल्या, तर दुसऱ्या डावात ११ षटकांत ३८ धावा दिल्या. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत कुलदीपला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या ऐवजी ३३ वर्षीय सारांशला कसोटी पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. सारांशने ५४ प्रथम श्रेणी सामन्यांत १८८ विकेट घेतल्या आहेत. दुसरी कसोटी २३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
IND vs SL : भारताकडून १६५ धावांनी पराभव; श्रीलंकेच्या हातून कुठे निसटली मॅच? भावुक कॅप्टन डी सिल्वाने सगळं सांगितलंएका क्रीडा वाहिनेच्या कार्यक्रमात बोलताना अरनॉल्ड म्हणाले, ‘श्रीलंकेच्या डाव्या हाताच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे ऑफ स्पिनरला संघात समाविष्ट करणे योग्य ठरेल. परंतु हा निर्णय उद्यावरच सोडला पाहिजे; कारण खेळपट्टी पाहिल्यावरच परिस्थिती स्पष्ट होईल. खेळपट्टी कोरडी वाटली आणि स्टम्पच्या रेषेत सुरुवातीपासूनच वळण घेणारी असेल, तर सारांश जैन हा उत्तम पर्याय ठरू शकतो; पण जर खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल वाटली आणि सामना पुढे जाईल तशी संथ होणार असेल, तर श्रीलंकेच्या फलंदाजीला खिंडार पाडण्यासाठी कुलदीपची फिरकी आणि चातुर्य आवश्यक ठरेल.’ श्रीलंकेच्या पराभवाला आघाडीच्या फलंदाजांचे अपयश कारणीभूत असल्याचे अरनॉल्ड यांनी सांगितले.
IND vs SL : कोणाच्या लक्षात आलं नाही पण श्रीलंकेच्या कर्णधाराने पराभवासाठी तिसऱ्याच खेळाडूचं घेतलं नाव, कोण आहे मॅचविनर?‘चेंडू नवीन आणि कडक असतो, तेव्हा खेळपट्टीवरून काही प्रमाणात मदत मिळते. अशा वेळी फटकेबाजी करणे सोपे नसते. श्रीलंकेच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी खूप लवकर मोठे फटके मारण्याची चूक केली. अशा वेळी संयम महत्त्वाचा असतो. श्रीलंकेच्या खेळपट्ट्यांवर आवश्यक असणारा संयम दाखवण्याऐवजी, दडपण निर्माण झाल्यामुळे किंवा गोलंदाजांवर सुरुवातीलाच वर्चस्व गाजवण्याच्या प्रयत्नात श्रीलंकेच्या फलंदाजांची पडझड झाली. चेंडू मऊ झाल्यावर खेळाचे स्वरूप थोडे बदलते आणि ते फलंदाजांच्या पथ्यावर पडते, असे अरनॉल्ड यांनी स्पष्ट केले.
यशस्वी जायसवाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, मानव सुथार, सारांश जैन/कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा/ गुरनूर बरार
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा