समजा, जर तुम्ही 2005 साली 6.48 लाखांनी घर खरेदी केले. तेच घर 8 वर्षांनी 53 लाखांना विकले तर होणारा नफा तुमचा कॅपिटल गेन ठरतो. सेक्शन 54 नुसार, जर तुम्ही तुमच्या मालकीचे घर विकले आणि त्यातून मिळणाऱ्या नफ्याच्या रक्कमेतून नवे घर बांधले तर नफ्यावर आकारण्यात येणाऱ्या करात सवलत मिळते. पण ही सवलत मिळवण्यासाठी तुम्हाला काही अटी शर्ती पात्र करणे आवश्यक आहे.
अटी-शर्ती जाणून घेण्यागोदर दिल्लीत घडलेली घटना जाणून घेऊयात.
राज कुमार यांनी 2005 साली दिल्लीतील पश्चिम विहार येथे फ्लॅट खरेदी केले होते. त्याकाळी त्यांनी 6.48 लाख रुपयांनी फ्लॅट खरेदी केले. पुढे 8 वर्षांनी त्यांनी फ्लॅट 53 लाखांनी विकून टाकला. या व्यवहारावर त्यांना फार मोठा कॅपिटल गेन मिळाला. पुढे सेक्शन 54 च्या माध्यमातून कर सवलत मिळवण्यासाठी अर्ज केल्यावर ते फेटाळण्यात आले. मुळात, राज कुमार यांनी दिल्लीतील तिलकनगर येथे 47.38 लाख रुपयांनी नवीन फ्लॅटही खरेदी केले होते म्हणजेच जुने घर विकून कमावलेला नफा हा नवे घर घेण्यासाठीच वापरण्यात आला होता, तरीही त्यांना कर सवलत नाकारण्यात आली. आयकर विभागाचे म्हणणे होते की राज कुमार यांनी आधी नवीन घर खरेदी केले आणि मग जुन्या घराची विक्री केली त्यामुळे त्यांना सेक्शन 54 नुसार कर सवलत देता येणार नाही.
पुढे राज कुमार यांनी NFAC ची वाट धरली, पण तिथेही त्यांचा प्रश्न सुटला नाही. अखेर त्यांनी मदतीसाठी दिल्ली येथील ITAT कडे अपील केली. तिथे सेक्शन 54 सहित सेक्शन 148 नोटिसच्या मुदतीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आला. मुळात, आयकर विभागाला एखाद्या कर दात्याने भरपाई केलेल्या करामध्ये काही गफलत आढळली तर एका ठराविक कार्यकाळाच्या आत करदात्याला नोटिस देण्याची अट असते. पण आयकर विभागाने राज कुमार यांना मुदत संपल्यानंतर सेक्शन 148 नोटिस पाठवली जी ग्राह्य धरली जात नाही.
डॉलर घसरला, भारतीय चलनाला बळकटी, शेअर मार्केटही सुसाट; आता पुढे काय?मग ITAT चा निकाल काय?
ITAT म्हणते जुने घर विकण्याच्या आधी नवे घर घेतले तर या कारणामुळे सेक्शन 54 नुसार मिळणारी कर सवलत नाकरता येत नाही. जर जुने घर विकण्याच्या 1 वर्ष आधी किंवा 2 वर्षांच्या आत नव्या घराची खरेदी केली तर त्यावर सेक्शन 54 नुसार कर सवलत मिळते. दिल्लीची राज कुमार यांनी जुने घर विकण्याच्या 1 वर्ष आधी नव्या घराची खरेदी केली होती म्हणून ते सेक्शन 54 नुसार मिळणाऱ्या कर सवलतीला पात्र ठरतात.

